सासवड( प्रतिनिधी):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
पुरंदर तालुका शिक्षक समितीच्या वतीने पुरंदरच्या तहसीलदार रुपालीताई सरनोबत यांना निवेदन देण्यात आले . नाकाबंदीची कामे शिक्षकानी अतिशय उत्तम रित्या केली असून आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. पुस्तके वाटप , गणवेश वाटप नियोजन सुरु असून मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. त्यामुळे शैक्षणिक कामे वाढत असून रेशन वाटप आणि गाव सर्वेक्षण कामातून जिल्हा परिषद आणि जेजुरी, सासवड नगरपालिकेतील शिक्षकाना तातडीने मुक्त करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचर , महिला आघाडी अध्यक्षा मा. मधुबाला कोल्हे , जिल्हा संपर्कप्रमुख संदीप जगताप, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर , शिक्षकनेते शाग्रुधर कुंभार , लतिफ़भाई इनामदार , मनोज सटाले हे उपस्थित होते. लवकरच या कामातून मुक्त केल्याचे आदेश काढू असे आश्वासन मा. तहसीलदार यांनी समितीच्या प्रतिनिधीना यावेळी दिले.