कापूरहोळ( वार्ताहर):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना विषाणूचं संक्रमण सुरू झालं आणि माणूस माणसापासून दूर जाऊ लागला. लॉकडाऊन झालं, शहर बंद झाली, गावं बंद झाली. विषाणू संक्रमित भागातील एखादा व्यक्ती जवळ आला तरी त्याला लोक टाळू लागले. शेजारी बसलेला साधा खोकला तरी लोक संशयाने पाहू लागले. थोडक्यात काय तर प्रत्येकजण आपापली, आपल्या कुटुंबाची सुरक्षितता पाहू लागला. कोरोनापासून आपण कसे सुरक्षित राहू याची काळजी घेऊ लागला. अनेक ठिकाणी लहान-मोठ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडणे बंद केले होते. अशा धोकादायक परिस्थितीत थेट कोविड (कोरोना) रुग्णावर उपचार करणारे वैद्यकीय व्यवसायातील लोक देव बनून कोविड रुग्णांची सेवा दिवसरात्र करत होते.त्यातीलच सह्याद्री हॉस्पिटलमध्ये गेली अडीच महिन्यांहून अधिक काळ स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणारे डॉ. अमेय कर्णिक यांचे कोरोनाच्या काळातील वैद्यकीय कार्य प्रेरणादायी व मोठं आहे.
राजगड पोलीस स्टेशन खेडशिवापुरचे पी. एस. आय. समीर कदम म्हणाले की,अशा या कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी माझे मित्र डॉ. अमेय कर्णिक यांनी ही स्वतःला वाहून घेतलंय. गेल्या अडीच महिन्यापासून हा माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतःहून गेले आहेत. या परिस्थितीत आपला डॉक्टरी पेक्षा त्यांनी खऱ्या अर्थाने सार्थकी लावला आहे. अशा या माझ्या मित्राला माझा सॅल्युट.
--------------------------------------------