पुणे (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोंगवली ता. भोर येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालय,भोर येथे 9 जुलै 2020 रोजी या गावच्या हद्दीतील गट नंबर 602 ही जमीन भैरवनाथ देवस्थान इनाम जमीन आहे.
तहसील ऑफिस भोर,व मंडल अधिकारी किकवी यांना भोंगवली ग्रामस्थांनी केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, गोपीनाथ कृष्णा गुरव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी लिलाबाई गोपीनाथ गुरव या रक्ताशी निगडित वारस म्हणून त्यांची नोंद होती. त्यांचा मृत्यू शुक्रवार दिनांक 26/ 6 /2020 रोजी झाला. त्यांना मुलगा अथवा मुलगी कोणतीही आपत्ती वारस नाही .गट नंबर -602 मध्ये वारसदार कोणी नोंद करण्यास आले ,तर त्यास भोंगवली ग्रामस्थांचे हरकत आहे.
भोंगवली ग्रामस्थांचे म्हणणे ऐकले शिवाय त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय इतर कोणाचीही नोंद या जमिनीतील सातबारा किंवा 8 अ वर करण्यात येऊ नये ,असे मत भोंगवलीचे सामाजिक युवा कार्यकर्ते संतोष मोहिते यांनी ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केले.
या अर्जासोबत लिलावती गुरव यांचा मृत्यू दाखला व गट नं.602 चा 7 12 उतारा व अर्जासोबत भोंगवली ग्रामस्थांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.