शिवाजीराव निगडे गुरुजी यांचे निधन.

Maharashtra varta


 कापूरहोळ ( प्रतिनिधी):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

भोंगवली ता. भोर  येथील पुणे जिल्हा परिषद, पुणे तथा भोर पंचायत समिती भोरचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव  हरिभाऊ निगडे गुरुजी (वय 74) यांचे  नुकतेच वृद्धापकाळाने  निधन  झाले.

शिक्षण क्षेत्रात 30 वर्षाहून अधिक काळ प्रामाणिक व उत्कृष्ट काम त्यांनी केले. गोकवडी, सावदरे,राजापूर,न्हावी आदी गावांत शिक्षक ,मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले.

 भोंगवली  गावच्या  सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या निधनाने  भोंगवली गावावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या मागे 2 मुले  1 विवाहित मुलगी ,सुना ,नातवंडे  असा परिवार आहे. राजापूर ता. भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक अमोल निगडे यांचे ते वडील होत.
                
     शिक्षक संघाने वाहिली श्रद्धांजली

भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने अध्यक्ष म्हणून सुदामराव ओंबळे यांनी शिवाजीराव निगडे यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की,निगडे गुरुजींनी शिक्षण क्षेत्रात केलेले काम कौतुकास्पद व प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या निधनाने शिक्षक संघाचे मार्गदर्शक हरपले असून त्यांची पोकळी आम्हास सदैव जाणवेलं.

 भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस विजयकुमार थोपटे म्हणाले की, आमचे आदर्श गुरुजी असलेले शिवाजीराव निगडे,यांनी असामान्य कार्यकर्तृत्वाने वर्तमानाबरोबरच पुढील पिढ्यासाठीही प्रकाशवाट  निर्माण करून आदर्श जोपासला, त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. भोर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक बंधू -भगिनींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली


To Top