कापूरहोळ ( प्रतिनिधी ) - .
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
26/11 च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यात उत्कृष्ट कामगिरी करणारे "राष्ट्रपती पुरस्काराने" सन्मानित करण्यात आलेले पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांची नसरापूर ( ता. भोर ) येथील राजगड पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाली असून त्यांनी पोलीस निरीक्षक पदाचा पदभार नुकताच स्वीकारला आहे.
राजगड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी विनायक वेताळ यांची पोलीस निरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेताळ यांनी पदभार स्वीकारला आहे. मावळते सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांची बदली झाली आहे.
वेताळ हे सेवाभावी वृत्तीचे आणि शिस्तप्रिय ,कर्तव्यदक्ष कार्यकर्तृत्वान अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई, सातारा येथील शिरवळ, वाई आदी ठिकाणच्या पोलिस स्टेशन हद्दीत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. पोलीस मॅन्युअलचा त्यांचा अभ्यास मोठा असल्याने तत्कालिन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक जुने- नवे गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुंडांना दहशत बसवली आहे.
भोर तालुका पत्रकार संघाचे संजय इंगुळकर, किरण भदे, वैभव धाडवे, वैभव भुतकर, माणिक पवार, महेंद्र शिंदे, विठ्ठल पवार, राहुल पांगारे, तसेच पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक कौस्तूभ सागवेकर, हवालदार महादेव कुतवळ, प्रमोद भोसले, सचिन काळे, गणेश लडकत, नितीन रावते, सुधीर होळकर, हेमंत शिंदे, अनिता रवळेकर, हेमा भुजबळ, नसरापूर व्यापारी संघाच्या वतीने सोशल डीस्टन्स पाळून पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान, मावळते सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पोलीस ठाणे हद्दीत वचक ठेऊन गुन्हेगारी मोडीत काढली होती. तर नवनियुक्त अधिकारी विनायक वेताळ हे सुद्धा गुन्हेगारांचे कर्दनकाळ, शिस्तप्रिय,निर्भीड, अन्यायाला न्याय देणारे ,सत्याचा आग्रह व सत्याची पाठराखण करणारे म्हणून त्यांची प्रचिती असून अनेक गंभीर गुन्ह्याची उकल त्यांनी चोवीस तासांत उघड केल्याची नोंद आहे. असा कर्तव्यदक्ष ,पोलीस मॅन्युअलचा पोलीस अधिकारी राजगड पोलिस स्टेशनला मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
_______________________________