कापूरहोळ (वार्ताहर):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील दिवसांत झालेल्या पावसाने भात लावणी झाली, मात्र भोर तालुक्याच्या पूर्व भागात व हायवे पट्ट्यात पाऊस नसल्याने भात लावण्या खोळंबल्या असून ज्या शेतकऱ्यांना स्वतःची विहीर आहे त्या शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील
लगतच्या गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील भात लावणी रखडलेली आहे ,ज्या शेतकऱ्यांना स्वतःची विहीर,कृषी पंप बोअर आहे, त्यातील काही शेतकऱ्यांनी भात लावणी केलेली आहे.काही ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. दर वर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भोर तालुक्यात भात लावणी पूर्ण होते, मात्र यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार झाला असला तरी काही दिवसातच पावसाने दडी मारल्याने भात लागण रखडलेली आहे. मागील दिवसात पश्चिम भागांत व परिसरात पाऊस झाल्याने तेथील भागात भात लावणी झालेली आहे.मात्र उर्वरित ठिकाणची भात लावण्या खोळंबल्या आहेत.
(वर्वे बुद्रुक ता. भोर येथील प्रगतशील शेतकरी व उद्योजक शिवाजीराव गणपत भोरडे पाटील म्हणाले की, जगावर कोरोना सारखी महाभयंकर आपत्ती तिचा सामना सर्वांना करावा लागत असताना, त्यातच यंदा मान्सून पाऊस नसल्याने भात लावणी रखडलेली आहे . भात खाचरातील तरवे वाळून चालले आहेत .त्यांच्यावर रोग पडला आहे,मागील वर्षी पावसाने साथ दिली होती. त्यामुळे भात उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र यंदा पाऊस नसल्याने शेतकरी समाधानी नाही.)