संदेशतात्या धाडवे पाटील यांचे निधन.

Maharashtra varta



पुणे (विशेष प्रतिनिधी):----.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

"चंदन जळते शीतल मंद, 
"प्रेरित असा, कीर्तीचा सुगंध.
 झिजते  वात  तव ज्योतीची ,
   उजळण्या सर्व दिशा दाही .
"प्रीत, प्रेम, भक्ती" हीच जीवनशक्ती 
असा असावा देह चंदनापरी".. 

चंदनाच्या कीर्तीच्या सुगंधा प्रमाणे आपले जीवन सदैव दरवळत ठेवून आपल्या कुटुंबाला त्याचबरोबर समाजातील दीन दुःखी, गोरगरिबांची सेवा करणारे भोर तालुक्यातील सारोळे गावचे  दानशूर व्यक्तिमत्व,उद्योगपती, आदर्श समाजसेवक,भोर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते,  संदेशतात्या दिनकरराव धाडवे पाटील यांचे गुरूवार दि. 9 जुलै 2020 रोजी निधन झाले.

दि.7/7/2020 रोजी सांय ७ वाजता त्याचे लहान भाऊ विठ्ठलराव उर्फ बाळासाहेब दिनकरराव धाडवे पाटील (वय ५८ ) कोविड १९ आजाराने प्राण ज्योत मावळली होती.

 या धरणीवर कितीतरी जीव  जगतात.
 जन्मतात आणि वृद्ध होऊन सर्वांचा निरोप घेतात. लक्षात तेच राहतात ज्यांनी आपले जगणे समाजासाठी, दीन -दुःखीतांसाठी सार्थकी लावले व इतरांसाठी काहीतरी भरीव कार्य केले. माणसे जोडणे आणि ती आपलीशी करून ठेवणे ही एक अंगभूत कला आहे. ती सर्वांना साध्य होते असे नाही. माणसं जोडणारा असा एक अवलिया देव माणूस म्हणजे "संदेशतात्या  धाडवे पाटील."आपल्यातून  देवाघरी गेले. त्यांनी  चंदनाप्रमाणे आपला देह झिजवला. उदंड कीर्ती करून ठेवली.आई वडिलांनी घालून दिलेल्या संस्काराच्या मार्गावर चालत संस्काराचा वारसा व वसा त्यांनी  जोपासला. 

सारोळे गावच्या भौतिक सुविधांचा पाया घालण्याचे भरीव काम केले. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात, त्यांचे विशेष सामाजिक काम व योगदान होते.उत्कृष्ट ,निरपेक्ष ,स्वतःचे विशेष योगदान देऊन प्रेरणादायी काम  गावच्या व परिसराच्या विकासासाठी केले.


आधुनिक युगात, प्रचंड विस्तारित  शहरीकरणातही एकत्र कुंटुब पध्दती ही जीवन मूल्यांचा संस्कार जोपासत ती टिकवून ठेवली. कठोर परिश्रमाच्या बळावर ,व प्रामाणिकतेच्या जोरावर उद्योग क्षेत्रात त्यांनी  स्वतःचे स्थान निर्माण केले.

यशस्वी व   प्रेरणादायी उद्योजक म्हणून यश मिळविले, गरिब,प्रतिकूल  परिस्थितीमध्ये शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करत लोकप्रिय व प्रतिभावंत झालेला" धाडवे पाटील उद्योगसमूहास आपल्या कर्तृत्वाने वेगळी उंची दिली.   व्यवसायात प्रचंड  यश मिळविले. त्याचबरोबर  सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना,विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य  मदत करणारे "संदेशतात्या' अशी त्यांची ओळख होती. सारोळे गावच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते.

सध्या करोना रोगाने जगात हाहाकार माजवलेला असताना अश्या संसर्गजन्य आजाराच्या या काळात  मागील दिवसांत लॉकडाऊन च्या काळात  त्यांनी शेकडो गरजू लोकांना  जेवण  व अन्नधान्य पुरविले.  त्या ठिकाणी  स्वतः संदेशतात्या लक्ष ठेवून अन्नधान्य  वाटत होते.स्वतः ते याबाबत  देखरेख ठेवत होते. त्यांच्या निधनाने अनेकांनी आमचे पितृतुल्य , मायेचे छत्र हरपले. अशी प्रतिक्रिया  व्यक्त केली.संदेशतात्यांच्या अचानक जाण्याने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.आमच्या  जिवाभावाचे  तात्यासाहेब गेले. गोरगरिबांना मदत करणारे "शेठ" हरवले अशी भावना  दुःखद अंतकरणाने व्यक्त केली.


. त्यांच्या सामाजिक ,शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील विशेष  कामाची दखल घेत अनेक गुणवंत ,व आदर्श  पुरस्कार देण्यात आले.गावच्या व  समाजातील अनेक कामात त्यांनी पुढाकार घेत सामाजिक कार्यास व सामाजिक संस्थेस  प्रचंड  मदत उदात्त भावनेने केली .


त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी कळताच भोर,वेल्हे, तालुक्यात तसेच बारामती,  पुणे शहर ,पिंपरी चिंचवड, परिसरावर शोककळा पसरली. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी आणि दोन मुले आणि त्यांचे धाकटे बंधू अभयसिह धाडवे पाटील आणि परिवार  आहे.

धाडवे पाटील उद्योगसमूहाचे संचालक , भोर तालुक्याचे प्रसिद्ध उद्योगपती,आदर्श राजकीय व सामाजिक आणि  सांस्कृतिक व्यक्ती, सारोळे गावच्या सेवेची निष्ठा,व कर्तव्य तत्परता, प्रामाणिक  व्यक्ती  अशी प्रसिद्ध ख्याती "संदेशतात्यांची" होती. यानिमित्ताने त्यांचे  स्मरण करत आहोत."संदेशतात्या" नावाचा  हा वटवृक्ष आयुष्यभर इतरांना सावली देत राहिला. त्यांना सर्वजण प्रेमाने आदराने "संदेशतात्या" या नावानं आदराने संबोधत .संदेशतात्यांचा जीवन परिचय करून देताना त्यांचे जीवन पैलू उलगडून वाचकांसमोर आणताना अंतकरण माझे जड होत आहे.काय लिहावे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीने.संदेशतात्या हे  तेजस्वी सूर्य  होते. कारण उजेड देणारे पणतीची वात संपल्याने आज ती विझली आहे.संदेश तात्या हे भोर तालुक्याचे लढवय्ये नेतृत्व होते. कै. दिनकरराव धाडवे पाटील यांच्या निधनानंतर तात्यांनी आपले सामाजिक व राजकीय काम अभयशेठच्या सोबतीने चालू ठेवले होते. तात्यांची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही. त्यांनी केलेले कार्य ,त्यांनी रुजवलेली जीवन मूल्य,सारोळे गावच्या विकासाला दिलेले मूर्त रूप व बहुआयामी विकास  सदैव समाजाला भोर तालुक्याला व सारोळे गावास व त्यांच्या धाडवे पाटील परिवारास  प्रेरणा व आदर्श देत राहतील.सुर्यासमान तेजस्वी प्रकाश समाजाला  दिला. स्वतः जळत राहून इतरांना सदैव प्रकाश,ऊर्जा देत राहिले,संदेश तात्या.
अश्या थोर ,द्रष्ट्या राजकीय सामाजिक नेता असलेल्या आधारवड समाजसेवकास "महाराष्ट्र वार्ताच्या" वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

--------------------------------------------------
To Top