(मुलाचे साध्या पद्धतीत लग्न करत रायबा जगदाळे यांची सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत)
=======================
सासवड दि. २७ जुलै ( ता. पुरंदर) : गणेश लोणकर
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन न्यूज)
देशातील जनतेवर कोरोना व्हायरस सारखे जीवघेणे संकट आले आहे. यावेळी आपण स्वतः च्या घरातील आनंददायी क्षणात अधिक डाम डौल न करता एक सामााजिक जबाबदारी म्हणून काहीतरी सामााजिक कार्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे . असा विचार करणाऱ्या शेतकरी पैै. रायबा ( काका) मल्हारी जगदाळे व कुटुंबियांनी कोरोना व्हायरसशी दिवस रात्र लढणाऱ्या भोर उपविभागीय पोलीस कार्यालय व पुरंदर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या पुरंदर सोशल फाउंडेशनला ५० हजार रूपयांची मदत केली आहे.
पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या बोपगावचे पै. रायबा जगदाळे हे एक प्रगतशील सामाजिक भान असणारे अभ्यासू कष्टाळू शेतकरी आहेत. त्यांचा धाकटा सिव्हील इंजिनिअर मुलगा सचिनचे लग्न पिंपळे गावातील शंकर पोमण यांची कॉम्प्युटर इंजिनिअर मुलगी श्र्वेताली सोबत ठरले.
लग्नासाठी जुलै महिन्यातील तारीख निश्चित झाली होती. पण देशभर पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लग्न करण्याबाबत संभ्रम होता.
अखेर जगदाळे यांनी तारीख पुढे न ढकलता अत्यंत साध्या पध्दतीने वीस नातेवाईकांच्या उपस्थितीत आपला मुलगा सचिन आणि आणि नवरी मुलगी श्र्वेताली यांचा विवाह केला . यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळत उपस्थितानी मास्क वापरुनच दोघांना नव्या नात्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जगदाळे कुटुंबियांनी आपल्या मुलाचे लग्न घरातच अत्यंत साध्या पध्दतीने केले. एवढेच नाही तर आपण सामाजिक कार्यासाठी काहीतरी केले पाहिजे यासाठी लग्नात मोजकाच खर्च करून बचत झालेले ५० हजार रूपये पुरंदर तालुक्यातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या शेतकरी, आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या मुलांसाठी पुरंदर सोशल फाउंडेशनने सुरू करण्यात येणाऱ्या पुरंदर सोशल फाउंडेशन स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रांसाठी २५ हजार रूपये व भोर पुरंदर उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना कोरोना पार्श्वभूमीवर मास्क व सॅनेटायजर साहित्यासाठी २५ हजार रूपये सहाय्यता निधी साठी दिला . देशातील जनता कोरोना मुक्त व्हावी यासाठी आरोग्य यंत्रणा पोलीस सफाई कामगार हे दिवसरात्र काम करत आहेत. या लढ्यात आपला खारीचा वाटा म्हणून शेतकरी कुटूंबाने दिलेली मदत लाख मोलाची आहे.
पै. रायबा जगदाळे यांनी ऊसाच्या रसाच्या छोट्याशा उद्योगातून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत मोठा मुलगा नवनाथ यांना बी. ई. मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण देवून स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन केले व नवनाथ यांनी देखील आपल्या कुटुंबियांची परिस्थिती व आईवडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करत जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले . व सध्या ते भंडारा जिल्ह्य़ात आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा दुसरा मुलगा सचिनला देखील बी. ई. सिव्हिल इंजिनिअरिंग चे शिक्षण दिले असून ते पुणे येथील नामांकित कंपनीत उच्च पदांवर कार्यरत आहेत. कष्ट आणि मेहतीच्या जोरावर बोपगावामध्ये रायबा जगदाळे कुटुंबाला एक उच्चशिक्षित व सुसंस्कृत कुटुंब म्हणून ओळख आहे. नवनाथ जगदाळे साहेबांनी आपण एक पुरंदरचा भुमिपूत्र म्हणून एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दत्तकत्व घेतले आहे.
लग्नात होणारा वारेमाप खर्च टाळून जगदाळे कुटुंबियांनी सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत करणे हा राबविलेला उपक्रम ही नवी आणि वेगळी विवाह संकल्पना आपण सगळ्यांनी राबवणे काळाची गरज आहे असे भोर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यावेळी म्हणाले व जगदाळे कुटुंबियांचे आभार मानत नवदापत्यास शुभेच्छा दिल्या.
______________________________________
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-
मो. नं.९२२६८००७८३
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-
मो. नं.९२२६८००७८३