कापूरहोळ (प्रतिनिधी) -
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
कोरोना विषाणूचा संसर्ग भोर आणि वेल्हा तालुक्यात वाढत आहे. दोन्ही तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असून त्यातील बाबी पूर्ण झाल्या असून 23 जुलै 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीत कडकडीत लॉक डाऊनचे पालन नागरिकांनी करावे, जेणेकरून कोरोनाविषाणू ची साखळी तोडण्यास मदत होईल. असे प्रतिपादन भोर, वेल्हा ,मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोर व वेल्हा तालुक्यांमध्ये केल्या जात आलेल्या उपाययोजनांबाबत शनिवार दि. 18 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय, भोर येथे आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे व भोरचे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक,तालुका आरोग्य अधिकारी ,भोर चे पोलीस निरीक्षक राजू मोरे,वेल्हा पोलिस निरीक्षक विनायक देवकर, राजगड पोलीस स्टेशन नसरापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, इत्यादी अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीमध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये कोरोणा विषाणू (covid-19) चा वाढता प्रादुर्भाव व त्यावर केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती दोन्ही तालुक्यांमध्ये जिल्ह्यात 31 जुलै 2020 पर्यंत लागू केलेल्या लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याची आवश्यकता असलेबाबत मते या वेळेस मांडण्यात आली. त्यानुसार दिनांक 23 जुलै 2020 ते 31 जुलै 2020 पर्यंत लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणी करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
या बाबींना सूट.
या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये केवळ वैद्यकीय सेवा दूध व कृषिविषयक बाबींना सूट देण्यात येईल असे निश्चित करण्यात आले.
तपासणी पथके
या कालावधीमध्ये भोर तालुक्यात 30 ठिकाणी तर वेल्हा तालुक्यात 16 ठिकाणी तपासणी पथके तैनात केली जाणार आहेत. व लॉक डाऊन ची उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या कालावधीसाठी आवश्यक असलेले अत्यावशक रेशन वगैरेचा पुरेसा साठा शहर दूध ग्रामदूत यांच्यामार्फत करून ठेवावा व या कालावधीत कडकडीत लॉक डाऊनचे पालन करावे असे आवाहन आमदार संग्राम थोपटे व प्रशासन मार्फत करण्यात आले. जेणेकरून कोरोनाविषाणू ची साखळी तोडण्यास मदत होईल.