कापूरहोळ :-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
पावसाळा सुरू झालाय, पेरण्या झाल्या की शेतकरी राजाची लगबग सुरू झाली ती आपल्या लाडक्या बैलाचा सण साजरा करण्याची,तो सण म्हणजे बेंदूर . भोर तालुक्यात बेंदूर सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.करंदी खे. बा. पंचक्रोशीत व भोर तालुक्यात बेंदूर सण साध्या पध्दतीने साजरा केला.
.यादिवशी बैलांना न्हावू-माखू घालून त्यांना सजवलं गेलं आणि पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. जातो. याशिवाय घरात मातीचे दोन बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला .
बैलाला या दिवशी सर्व कामातून सुट्टी दिली गेली. बैलांना हिरवा चारा दिला. पुरणपोळीचा नैवेद्य दिला . दुपारनंतर बैलाला सजवले. त्यांच्या शिंगांणा रंग दिला गेला. अंगावर झूल घातली. बेगड्या चिटकवल्या . डोक्याला बाशिंग आणि गळ्यात घुंगरांची माळ घातली . यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला गेला. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे ठसे उमटवले त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढली गेली.
करंदीचे प्रगतशील शेतकरी उत्तम काका गायकवाड म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांनी बेंदूर सणाची तयारी केली. पण यंदा कोरोना रोगाच्या संकटामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांनी बेंदूर सण घरच्या घरी साजरा केला .बेंदराआगोदर खूप पाऊस असायचा. भात लावणी व्हायची, मात्र यंदा पाऊस समाधानकारक नसल्याने भात लावण्या खोळंबल्या आहेत,कोरोना संकटामुळे व पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह नाही.