कापूरहोळ ( प्रतिनिधी)--
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
महाराष्ट्र राज्यात लोकाभिमुख आदर्श समाज व राजकारण करणारे आमदार तथा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी घालून दिलेल्या संस्कार विचारांच्या आधारावर आझाद फाऊंडेशन आगामी काळात प्रभावी काम करेन ,असे प्रतिपादन आझाद फाऊंडेशन ,महाराष्ट्र राज्याचे सदस्य संतोष अप्पा साठे यांनी केले.
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस आझाद फाउंडेशनने महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधत "आझाद फाउंडेशनची" स्थापन करून सामाजिक उपक्रमांनी वाटचाल राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या जन्म दिवसापासून सुरू केली.
आझाद फाउंडेशनने अनाथ झाड़े लावण्याचा कार्यक्रम पुणे शहर व जिल्ह्यात घेण्यात आला.ठिकठिकाणी अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी संतोष साठे ,उमेश महाडिक , नयन पुजारी, सुरज कांबळे,भास्कर शिरसट,अमोल मानकर, नितिन पगार, सागर ननावरे, सुनील बारवकर ,अनिकेत कदम , बुवा ताकभाते ,संतोष अभंग , आकाश पाटोळे, सोमनाथ पायगुडे यांचा विशेष पुढाकाराने कार्यक्रम संपन्न झाला.
अनाथ झाड़े जी घराच्या आसपास किवा रस्त्यालगत व बाजूला आहेत ,ती सर्व झाड़े एकत्र करून एक आगळा वेगळा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आझाद फाउंडेशन कडून पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला.त्यामध्ये नांदोशी ,तळजाई टेकडी ,वडगावशेरी ,वारजे माळवाडी ,जुन्नर ,भोर ,नीरा ,सासवड़ येथे वृक्षारोपण करण्यात आले . रुग्ण सेवा , अपंग सेवा , पुणे शहर / जिल्ह्यातील संबंधित विविध समस्या यांना न्याय मिळवून देण्यासाठी "आझाद फाऊंडेशन" सज्ज झाले आहे.
पतितपावन संघटनेचे विजय क्षिरसागर आणि मित्र परिवार, रे ऑफ होप फाउंडेशन चे सॅम डिसूझा आणि सेवक सहकारी उपस्थित होते.
आझाद फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
(यावेळेस आझाद फाऊंडेशन चे सदस्य संतोष अप्पा साठे म्हणाले की,"सेवा हाच धर्म", राज्य मंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या विचाराने "आझाद फाउंडेशन" नावाचे सामाजिक विकासाचे नवीन वादळच येत आहे, याची ही पूर्व सूचनाच आहे .महाराष्ट्र राज्यातून हजारो युवक उत्स्फूर्त पणे"आझाद फाऊंडेशन" मध्ये प्रवेश करत आहेत.)
_________________________