शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी दत्तक घेतली, चंपाकली हत्तीण!

Maharashtra varta



 पुणे( प्रतिनिधी):- .
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथे पर्यटकांच्या सेवेत असलेली चंपाकली नामक हत्तीण शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना भावली. त्यांची पत्नी नयना कडू यांच्या उपस्थितीत २१ हजार ५०० रुपये व्याघ्र प्रकल्पाकडे नगदी भरून तिला दत्तक घेतले आहे.आता ही चंपाकली ना. बच्चू कडू यांच्या नावे ओळखली जाणार आहे. तिला घरी नेता येणार नाही; पण आपला दत्तक हत्ती कसा राहतो, त्याची देखभाल कशी ठेवली जाते, त्याची दिनचर्या काय, त्याला खायला काय दिले जाते, आरोग्याची काळजी कशी घेतली जाते, यांसह अन्य बाबींची माहिती ना. कडूंना घेता येणार आहे. या चंपाकलीला भेटण्याची मुभा त्यांना राहणार आहे. ते मेळघाटात पोहोचल्यानंतर त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था व्याघ्र प्रकल्पाकडून विनामूल्य केली जाणार आहे.


इंदिराजींनंतर बच्चू कडू
.
 


कोलकास येथील वन विश्रामगृह तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या मुक्कामाने नावारूपास आले आहे. इंदिरा गांधींचा तो कक्ष बघणारे पर्यटक आजही आहे. त्या वन विश्रामगृहाला इंदिराजींमुळे वेगळी ओळख मिळाली. आणि आज कोलकास येथील चंपाकली ला बच्चू कडू यांनी दत्तक घेतल्यामुळे कोलकास येथील हत्तीलाही नवी ओळख मिळाली आहे.

 बच्चू कडू पहिले पालक.

२०१८ पासून ही दत्तक योजना असली तरी आतापर्यंत कुणीही पुढे आलेले नाही. दत्तक घेण्याचे आवाहन व्याघ्र प्रकल्पाकडून देशभर केले गेले. मात्र, हत्तिणीला दत्तक घेणारे बच्चू कडू हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.


_______________________
To Top