किकवी (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
ग्रामपंचायत केंजळ व आदर्श मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतदादा बाठे यांच्या प्रयत्नातून आदर्श ग्राम केंजळ ता. भोर येथे विविध विकासकामांचे उदघाटन गुरुवारी दि.20ऑगस्ट 2020 रोजी होणार असल्याची माहिती केंजळ गावचे उपसरपंच महेश बाठे यांनी पत्रकारांना दिली आहे.
केंजळ येथे ओपन जिम व जॉगिंग ट्रॅक, शाहू-फुले-आंबेडकर ग्राम अभ्यासिका, अंतर्गत रस्ते व बंदिस्त गटर पेविंग ब्लॉक, शेत रस्ते ,पाणीपुरवठा सोलर सिस्टिम आदि विकास कामांचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मला ताई पानसरे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजितदादा शिवतरे व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद दादा काकडे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तरी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे वीरधवल जगदाळे (संचालक दौंड शुगर ,जि. प. सदस्य) ,प्रताप पाटील(जि. प. सदस्य,इंदापूर)तसेच भोर पंचायत समिती भोरचे सभापती, उपसभापती, सदस्य तसेच भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.