भोर (प्रतिनिधी)
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
रविवार (दि.9) ऑगस्ट 2020 रोजी करंदी खे. बा. (ता. भोर) येथील व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला त्यामुळे त्यास भोर येथील कोविड केअर सेंटरला हलविल्यानंतर करंदी खे. बा.गावात कोरोना प्रतिबंधासाठी आज( दि.10) रोजी विविध उपाययोजना केल्या.गावातील प्रत्येक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन करंदी खे. बा. च्या सरपंच अलका तळेकर यांनी केले.
करंदी खे. बा. गावामधील भैरवनाथ मंदिर ते विठ्ठल रुख्मिणी मंदिर ते पोटे घरापर्यंत सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला .
आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खे. बा. येथील शिक्षक यांच्या मदतीने गावाचादेखील सर्वे केला.सर्वे मध्ये तालुकाबाह्य व जिल्हा बाह्य प्रवास करणाऱ्या व्यक्ती,सदर कुटुंबात सर्दी, खोकला ताप लक्षणे आहेत काय?,कुटुंबात आजाराचा पूर्वइतिहास,60 वर्षावरील व्यक्ती संख्या आदी बाबींचा सर्वे करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तानाजी नाईलकर यांनी सांगितले.
या बाबत बोलताना करंदी खे. बा.गावचे ग्रामविकास अधिकारी परमेश्वर गोमसाळे म्हणाले, की “गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावांतील व बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तीने मास्क न लावल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करंदी खे. बा.गावातील सरपंच, व त्यांचे सहकारी ,आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,मदतनीस, ग्रामपंचायत व महसूल कर्मचारी हे सर्व प्रशासकीय कर्मचारी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रभावीपणे काम करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी निष्काळजीपणे न वागता सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटाझर वापरणे, सार्वजनिक कार्यक्रम , अनावश्यक बाहेर न फिरणे ,गर्दी न करणे ,वाढदिवस आदी गर्दीचे कार्यक्रम टाळा. प्रत्येकाने काळजी घ्यावी अन्यथा येणाऱ्या कोरोना आपत्तीतून आपणास कोणीही वाचवू शकणार नाही”. असे मत नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहाय्यक आरोग्य अधिकारी अनिल नाईक यांनी केले.
यावेळेस कृषी सहायक, गुरव , आरोग्य सेवक राजेंद्र मोरे,,साधना पोळ,(समुदाय आरोग्य अधिकारी), वंदना वाघमोडे, अंगणवाडी सुपरवायझर विद्या सोनवणे, शिक्षिका सुजाता तळेकर, पंकज राठोड,अंगणवाडी सेविका उषा खाटपे,आशा वर्कर नीलिमा शिंदे, शिपाई चंद्रकांत म्हस्के आदी उपस्थित होते.