कापूरहोळ( वार्ताहर):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व करंदी खे. बा. या गावात एक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. गावांतील व बाहेरून करंदी खे. बा. गावात येणाऱ्या व्यक्तीने मास्क न लावल्यास 500 रुपयांचा दंडाची कार्यवाही लगेच करावी त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कडक अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे. यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करंदी खे. बा.गावात आज( दि.11)रोजी भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी भेट दिली. त्यावेळेस ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की,गावातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना औषधे देणे,सामान्य सर्दी, ताप,खोकला असलेल्या व्यक्तींना गोळ्या देणे, कोरोनाच्या लक्षणे दिसताच प्रशासनास कळविणे, दैनंदिन सर्वे करून प्रशासनास माहिती द्यावी, सरपंच व सदस्यांनी घरोघरी भेट देणे याबाबत त्यांनी ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांना सूचना दिल्या. कोरोना सर्वेची पाहणी करण्यात आली.त्यांच्यासमवेत भोर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर व्ही. चांदगुडे,व आर आर राठोड उपस्थित होते.
यावेळेस करंदीचे सरपंच अलका तळेकर ,व ग्रामसेवक परमेश्वर गोमसाळे, त्यांच्या सोबत शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,आरोग्य कर्मचारी, उपस्थित होते.