कापूरहोळ( वार्ताहर):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
सिनेमा स्टाईलमध्ये पाच दरोडेखोरांच्या टोळीने भर दिवसा पोलीसी वेशात रिव्हाॕल्वर चा धाक दाखवून पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गालगत वर्दीळीच्या ठिकाण असलेल्या कापुरव्होळ (ता.भोर ) येथील बालाजी ज्वलर्समधील अर्धा किलोच्या आसपास सोन्यानाण्याचे दागदागिने चोरी करून पसार झाले.
महामार्गावरील कापुरव्होळ चौकातील गजबजलेल्या ठिकाणी गुरूवार दि.६ रोजी दुपारी पावणेपाच आसपास पोलीसवेशातील आरोपी पकडून आणल्याचा सिनेमा नाटक करून बालाजी ज्वलर्सचे मालक सुमित संजय निकम यास चोरीचा माल घेतल्याचा आरोप करून दुकानातील सोन्याचे दागिने दोन बॕगामध्ये भरण्यास सुरूवात केली.
मात्र दरोडेखोर दुकानातून बाहेर पडताच बालाजी ज्वलर्सचे मालक सुमित निकम यांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यावेळेस दरोडेखोरांनी दुकानाच्या व आजूबाजूच्या दुकानावर पाच गोळ्या झाडून दशहत निर्माण केली. सुदैवाने कोणालाही गोळी लागली नसल्याचे सांगण्यात आले. महामार्गावर सातारा दिशेने स्विफ्ट डिझायर गाडी नं .एमएच १२ एफ.के २०४१ ने पळाले.
राजगड पोलीसांच्या माहिती नुसार दरोडेखोर स्विफ्ट गाडीने सातारा दिशेने नंतर सारोळा वीर रोडने निरा फाटक ओलांडले अशी मिळाली.
(राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ म्हणाले की,दरोडेखोरांचा पाठलाग पोलीस करत आहे.दरोडेखोरांना पकडण्यासाठी तात्काळ ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल.)
पुढील तपास राजगड पोलीस निरिक्षक विनायक वेताळ करित आहेत.