किकवी (प्रतिनिधी):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
केंजळ गावाची ओळख परिपूर्ण विकासाचे गाव म्हणून होत आहे. चंद्रकांत बाठे व सुनीता बाठे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे विकास कामे होत आहे.गावचे सामाजिक प्रश्न व अधिकारी व पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवल्यास विकास कामे मार्गी लागतात. पद नसताना गावच्या विकासाठी चंद्रकांत बाठे बांधिलकी जपतायेत. त्यातूनच केंजळ गावाला विकासाची नवी ओळख मिळाली. केंजळ गावांत अत्याधुनिक विकासकामे झाली. असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी केले.
ग्रामपंचायत केंजळ व आदर्श मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतदादा बाठे यांच्या प्रयत्नातून केंजळ ता. भोर येथे विविध विकासकामांचे उदघाटन प्रसंगी निर्मलताई पानसरे बोलत होत्या. केंजळ येथे ओपन जिम व जॉगिंग ट्रॅक, शाहू-फुले-आंबेडकर ग्राम अभ्यासिका, अंतर्गत रस्ते व बंदिस्त गटर पेविंग ब्लॉक, शेत रस्ते ,पाणीपुरवठा सोलर सिस्टिम आदि विकास कामांचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मला ताई पानसरे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे व पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद दादा काकडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी केंजळ येथील भोर तालुक्यात उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करणारे महेश बाठे,माऊली बाठे, बिपीन बढे, ग्रामविकास अधिकारी मच्छिन्द्र लेंडवे, कमल बाठे,व फोटोग्राफर प्रसाद भालघरे, राहुल बाठे,विक्रम लव्हळे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.
सभापती प्रमोद काकडे,वीरधवल जगदाळे यांची मनोगते झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे वीरधवल जगदाळे (संचालक दौंड शुगर ,जि. प. सदस्य) ,संतोष घोरपडे, विक्रम खुटवड,चंद्रकांत बाठे ,सुनीता बाठे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे,दमयंती जाधव,प्रफुल्ल तावडे,इकबाल शेख,सरपंच माया नेवसे,उपसरपंच महेश बाठे,सदस्य ,मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत बाठे यांनी करून आभार प्रकाश तनपुरे यांनी मानले.