कापूरहोळ( प्रतिनिधी):-
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
रणजीत शिवतरे (उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद पुणे) यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून फिरून शासकीय अधिकारी यांच्या मीटिंग घेऊन कोरोना काळामध्ये शासकीय रुग्णालय मध्ये ICU, व अत्याधुनिक सोयी-सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिल्या, शिक्षण अधिकारी यांना सूचना करून मुलांना ऑनलाईन शिक्षण देणे, प्रत्येक तालुक्यामधून रेशन उपलब्ध करून देणे, जीवनावश्यक वस्तूंचे हजारो गोर गरीब व गरजू लोकांना वाटप केले, अहोरात्र मा. श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब, मा. श्री. अजितदादा पवार साहेब व मा. सौ .सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शन घेऊन अतिशय योग्य प्रकारे नियोजन करून कोरोना संकटाला धर्याने मुकाबला केला. त्यामुळे त्यांना भोर तालुका कुंभार समाजाने दखल घेऊन प्रथमच kovid 19 कोरोना योद्धा सन्मानपत्राने रणजित शिवतरे यांचा सन्मान करण्यात आला.
रणजित शिवतरे यांनी कुंभार समाजाची संवाद साधत गणपती मूर्ती आर्थिक नुकसान बाबत चर्चा केली . समाज्याला आर्थिक भरीव मदत करू असे आश्वासन यावेळेस त्यांनीं दिले. सतीश दादा दरेकर (अध्यक्ष, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेश )यांचेशी फोनवरून चर्चा केली. रणजित दादांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिल्याबद्दल पुणे जिल्हा कुंभार समाजाचे व भोर तालुका कुंभार समाजाने पुढाकार घेतल्याने त्यांचेही आभार मानले
रणजितदादा शिवाजीराव शिवतरे (उत्रोली. ता. भोर जि. पुणे )उपाध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद पुणे यांना कोविड 19 कोरोना योद्धा समाजरक्षक सन्मानपत्र 2020 सन्मानपूर्वक देताना सुनील कुंभार अध्यक्ष, भोर तालुका कुंभार समाजोन्नती मंडळ भोर, अरुण कुंभार सरचिटणीस, नामदेवराव कुंभार सरपंच निगडे, श्री. दिलीपराव डोके व अभिजित कुंभार सदस्य ग्रा. पं. उत्रोली ता. भोर.यावेळेस उपस्थित होते.