सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान व आम्ही भोरकर प्रतिष्ठान च्या वतीने अन्नधान्याचे वाटप.

Maharashtra varta

सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान व आम्ही भोरकर प्रतिष्ठान च्या वतीने अन्नधान्याचे वाटप.

भोर ( प्रतिनिधी) :---तृप्ती यादव पवार.

भोर तालुक्यातील रायरेशवर गडावरील वंचीत व दुर्गम भागातील गरजूंना लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले . दुर्गम डोंगराळ भागातील ऐतिहासिक रायरेश्वर पठार येथील 51 खूप गरजू  कुटुंबाना सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान व आम्ही भोरकर प्रतिष्ठान यांच्या वतीने कोरोना संकट काळात खूप गरजेचे  जीवनावश्यक मोलाच्या मदतीचा हात दिला .जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला .या जीवन आवश्यक वस्तूच्या किटमध्ये 1 महिना पुरेल इतके गहू , तांदूळ , डाळ , गूळ , मिरची पावडर व कांदा लसूण मसाला देण्यात आले .समाजातील खऱ्या अर्थाने दुर्लक्षित व वंचीत कुटुंबाना यामध्ये प्राधान्य देऊन आवश्यक मदत देण्यात आली आहे .

याप्रसंगी सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठानचे सदस्य पराग शिळीमकर , मानतेश कोळी , अक्षय शिळीमकर , तुषार शिळीमकर , सचिन शिळीमकर ,प्रसाद कल्याणकर , गैारव ढमाले , अमोल शितोळे , निर्मल शिळीमकर , सुप्रिया शिळीमकर  आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन देशमुख , उपाध्यक्ष समीर घोडेकर सदस्य डॉ .कमलेश धुमाळ , विनायक कंक , प्रीतम धरू ,सुनील तुपे , मोहन टोळे , विक्रम तुपे उघोजक प्रशांत सुके , व धर्मवीर संभाजी महाराज ट्रस्ट पुणेचे सुनीता पासलकर , मंगला घोलप , स्नेहा बंटू  , अमित घोडके , संदीप वाव्हळ ,महेश कुलथे , गोरक्ष भणगे , भीमाशंकर कोळी , महादेव दिवटे आणि रायरेश्वर ग्रामस्थ सुनील जंगम , विठ्ठल जंगम , गोपाळ जंगम , नारायण जंगम , काशिनाथ जंगम , सखाराम जंगम , नथु जंगम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते .

To Top