पौड (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
कोरोनाच्या प्रादुर्भावात पुरेश्या प्रमाणात आरोग्यसुविधांची असलेली गरज सर्वांच्याच लक्षात आली असून त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णालयांची आणि बेड्सची आवश्यक असलेली संख्या हा भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा असा विषय लक्षात घेऊन शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने PMRDA आयुक्त दिवसे तसेच टाऊन प्लॅनर गिरकर यांची भेट घेऊन नवीन विकास आराखड्यात मुळशी तालुक्याला शासकीय उपजिल्हा रुग्णालयासाठी 5 एकर गायरान जागेवर आरक्षण ठेवण्यात यावे अशी मागणी पुणे जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख अविनाश बलकवडे यांनी केली आहे".
संदर्भित मागणीचा सकारात्मक विचार करून जास्तीत जास्त जागा नवीन विकास आराखड्यात रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्त साहेब यांनी दिले त्याबद्दल त्यांचे आणि गिरकर यांचे पक्षाच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी विद्यार्थी सेना संघटक रामभाऊ गायकवाड, महिला आघाडी संघटिका ज्योतीताई चांदेरे, सरपंच परिषदेचे मा.अध्यक्ष हनुमंत सुर्वे, युवासेना समन्वयक वैभव शितोळे, उपतालुकाप्रमुख गणेश भोईने, उपतालुकाधिकारी प्रतीक दगडे, विभाग अधिकारी निलेश दगडे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.