आमच्या वहिनी एक आधारस्तंभ :- रावसाहेब शितोळे सर.

Maharashtra varta
           
     

नसरापूर (प्रतिनिधी)-
(न्यूज वार्ता ऑनलाईन)

#  वहिनी एक आधारस्तंभ #
सतत घरातील कोणत्याही कामात मग्न असणारी अशी आमची काल कथित रंजना रजनिकांत शितोळे (वहिनी).घराच्या मागील परसबागेतील अनेक फळझाडे आणि विविध फुलांची रोपं वहिनीने काळजीपूर्वक वाढविली.झाडांचं महत्त्व ती आपल्या कृतीतून पटवून द्यायची .कोणीही पाहुणे आले तरी आनंदाने त्यांचा पाहुणचार  ती करायची.वहिनीचे माहेर चिखली( नानीबाई)तिच्या माहेरची माणसं ही खूप प्रेमळ.आम्हा सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठ्या चुलत भावाला आम्ही आण्णा असे म्हणतो आण्णा आणि वहिनी हे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ .परंतु अचानकपणे दि २९  ऑगष्ट  २०२० रोजी काळाने वहिनीवर झडप घातली . सर्वांचा  आधारस्तंभ कोसळला.


 मी आणि सौ. विद्या पुण्याहून सुट्टीला गावी गेल्यानंतर वहिनीला खूप आनंद होत असे .सुट्टी संपल्यावर निरोप घेताना मात्र आण्णा आणि वहिनीचे डोळे भरून यायचे .पुन्हा पुढील सुट्टीला गावीच या. असे अगदी मनापासून वहिणींच सांगणं असायच.आता सुट्टीला कधी गेल्यानंतर वहिनी नसणार हा विचारच करवत नाही . आण्णा  आता शिक्षकसेवेतून निवृत्त आहेत. 

वहिनीची अण्णाला मोलाची साथ मिळाली. त्यामुळे आण्णाने ज्ञानदानाचे मोलाचे कार्य आपल्या शिक्षकी सेवेतून बजावले.  आपल्या परिवारातच  आठ शिक्षक असल्याचा अभिमान वहिनीला नेहमी वाटत असे .कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगात वहिणींचा खूप मोठा आधार असायचा. तो आधार आता हरपला.वहिनी तुझ्या जाण्याने आमच्या  परिवारावर खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तुझ्या अशा अचानक जाण्याने नेमचंद, मोहन, आणि मौसमी (साधना)ही लेकरं पोरकी झाली आहेत .सुनेला सुद्धा मुलीप्रमाणे माया तू लावली, त्यामुळे सून रोहिणी ने सुद्धा तुझ्याकडून मार्गदर्शन घेत सर्वांचा पाहुणचार करण्यात तिने पण कधीच कंटाळा केला नाही. वहिनी तुझ्या अस्तित्वाशिवाय हे घर खूप रिकामं झालं आहे. तुझा आशीर्वाद  आम्हा सर्वांवर अखंडपणे राहो .तुझ्या स्मृती सर्वांच्या ह्रदयात कोरलेल्या असतील. वहिनी तुला आम्हा सर्व राम -कृष्णाई निवास परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली💐💐💐💐

                  @ शब्दांकन-@
         रावसाहेब शितोळे सर
     पदवीधर शिक्षक शाळा उंबरे 
                 ता. भोर,  जि पुणे.

To Top