भोर (प्रतिनिधी):-
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
भोर तालुक्यातील शिक्षक व केंद्रप्रमुख माहे एप्रिल 2020 पासून covid-19 अंतर्गत नाकाबंदी ,सर्वेक्षण कोविड केअर सेंटर ,ऑनलाईन माहिती, माझे कुटुंब माझे जबाबदारी, सर्वेक्षण काम, रेशनिंग वाटप ,पर्यवेक्षीय काम तसेच वेळोवेळी प्रशासनाने सोपवलेल्या जबाबदारीचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहे,तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना कोविड कामातून वगळण्याची सहानुभूतीपूर्वक विनंती निवेदनाद्वारे भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रशासनास करण्यात आली आहे.
त्या निवेदनात खालील मागण्यांचा विचार करण्यात यावा,असे देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शिक्षकांना सद्यस्थितीत ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचे कामकाज सुरू झालेले असल्याने covid-19 कामामुळे मुलांचे शैक्षणिक कामाकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे, ज्या शिक्षकांचे व केंद्रप्रमुख यांचे वय वर्ष पन्नास आहे, तसेच बीपी शुगर अपंग इतर दुर्धर आजाराने त्रस्त आहेत, अशा शिक्षक महिलांना व केंद्रप्रमुखांना कोविड चे कामातून प्राधान्याने वगळण्यात यावे .सर्व केंद्रप्रमुख यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे तसेच काही अपंग व दुर्धर आजाराने त्रस्त आहेत तरी त्यांना covid-19 या कामातून प्राधान्याने वगळण्यात यावे व कोविड केअर सेंटरचे काम शिक्षक व केंद्रप्रमुख सुरुवातीपासून काम करीत आहे तरी सदर कामासाठी इतर विभागांचे कर्मचारी घेण्यात यावेत ,कोविड केअर सेंटरमध्ये रात्रपाळी ची ड्युटी लावण्यात आलेली आहे ,परंतु रात्रपाळी सेंटरचे दरवाजा बंद केल्यानंतर रात्रपाळीस काहीच काम नसते ,त्यामुळे शिक्षकांना नाहक त्रास होत आहे, त्यामुळे सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच ड्युटीला लावावी.
कोविड या कामामुळे शिक्षकांना विषाणूची लागण झालेली आहे व त्यांना बेड उपलब्ध होत नाही, तरी कोविड झालेल्या शिक्षकांना बेड उपलब्ध करून देण्यात यावे. शिक्षकांना कोरोना विमा संरक्षण मिळावे. कोविड या कामातून महिलांना शिक्षकांना वगळण्यात यावे या सर्व शिक्षकांना कोविड च्या कामातून वगळण्यात यावे, अशी विनंती निवेदनाद्वारे भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून तहसीलदार भोर, प्रांत भोर,गटविकास अधिकारी भोर, गटशिक्षणाधिकारी भोर यांना करण्यात आलेली आहे.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पोपटराव निगडे,शिक्षक संघाचे नेते ,चांगदेव मसुरकर,महेंद्र आप्पा सावंत ,भोर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुदामराव ओंबळे,, सरचिटणीस विजयकुमार थोपटे, ,पंडित गोळे, भोर तालुका केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ सोनवणे, मा. चेअरमन संदीप दानवले, प्रवीण नांदे, दत्ता पांगारे ,हनुमंत साप्ते आदी उपस्थित होते.