भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन चालक विकास शिंदे यांचे अंगावर वीज पडून निधन

Maharashtra varta

 


सारोळा (प्रतिनिधी)

(न्यूज वार्ता ऑनलाईन)


भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन चालक विकास शिंदे (वय 29) यांचे अंगावर वीज पडून काल दि.10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी भोंगवली प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरच अपघाती निधन झाले.


अतिशय नम्र,अनेक रूग्णांना, वाहन चालकांच्या रूपान जीवदान देणारा रात्री,अपरात्री रूग्ण व अधिकारी, कर्मचार्‍यांचे हाकेला धावून येणारे उमदे व्यक्तिमत्त्व होते. कोरोनाच्या या कठीण काळात त्यांनी मोठे योगदान देऊन आपले कर्तव्य प्रामाणिक बजावले होते.त्यांचे अकस्मात निधनाने सर्व जणांनी, दुखः व्यक्त केलं आहे.

ईश्वर त्यांच्या  मृतात्म्यास चिरशांती देवो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी वाहिली आहे.



To Top