भोर( प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
ग्रामीण भागामध्ये "गाव तिथे वाचनालय" उपक्रम कृष्णाई जनसेवा संस्थेच्या संकल्पनेतून गाव तिथे वाचनालय हा उपक्रम साळेकरवाडी वाठार (हि.मा) येथे सुरू करण्यात आला.विद्यार्थी ,युवकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक वाचनालय हा उपक्रम राबवण्यात आला.
वाचनालयासाठी कपाट, ३०० पुस्तके व वर्तमानपत्र देण्यात आली या वाचनालयाचा विद्यार्थी ,युवक,जेष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे .प्राचार्य शिवाजीराव भोसले सार्वजनिक वाचनालय साळेकरवाडी वाठार (हि.मा) येथे या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली .उपक्रमासाठी डॉ. राहूल शुक्ला सर व युवक मित्र मंडळ पुणे यांचे सहकार्य लाभले .
या उपक्रमासाठी मान्यवर डॉ.आंनदा कंक, कृष्णाई जनसेवा संस्थेचे कार्यक्षम अध्यक्ष व आदर्श समाजसेवक बाबाजी साळेकर, कार्यध्यक्ष विनायक साळेकर ,संचालक सोमनाथ साळेकर , प्रहार अपंग संघटना अध्यक्ष बापु कुडले ,शिवमुद्रा युवा मंडळ साळेकरवाडीचे अध्यक्ष संजय दानवले, सुनिल साळेकर, दत्ताञय साळेकर, कुंडलीक कुडले , नारायण साळेकर,ज्ञानेश्वर साळेकर , विजय दानवले व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.