शिक्षकांना सरकारची दिवाळी भेट.

Maharashtra varta

 



सहकारी संस्थांच्या लाभांश वाटपाचे अधिकार संचालक मंडळास देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्राथमिक शिक्षक संघाने केली होती मागणी

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे शिक्षक संघाकडून स्वागत.

पुणे (विशेष प्रतिनिधी)

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

 कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या 2020-21 या वर्षासाठी महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्याचे अधिकार संचालक मंडळास देण्यास बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली या निर्णयामुळे पगारदार संस्थांच्या लाभांशाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती "प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे" यांनी दिली


सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा कोविडच्या पार्श्वभूमीवर रखडलेलल्या आहेत, राज्यभरातील सहकारी संस्थांमधील लाभांश वाटपास विलंब होत असल्याने लाभांश वाटप करण्याचा अधिकार या वर्षांपूरता वार्षिक सभेऐवजी संचालक मंडळास देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती,

बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी संस्थांच्या लाभांश वाटपाचे अधिकार, पुढील वर्षाच्या आर्थिक पत्रकास मंजुरी देणे व लेखा परिक्षकांची नेमणूक अशा महत्वाच्या विषयांसाठी वार्षिक सर्वसाधारणसभेने मंजूरी देण्याऐवजी संचालक मंडळास मंजुरीचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 65, कलम 75 व कलम 81 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे,



To Top