भेलके महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित.

Maharashtra varta




 नसरापूर (प्रतिनिधी):-

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर येथील महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मा. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांच्या जंयतीचे आणि वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आणि या कोरोना महामारीच्या संकटामध्ये सामाजिक अंतर ठेवणे, मास्क वापराने, सॅनिटायजर वापराने या सर्व बाबी लक्षात घेऊन महाविद्यालयातील ग्रंथालयात ग्रंथालयातर्फे वाचन प्रेमींसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांसाठी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती.

प्रश्नमंजुषा ५० मार्कची होती, जे प्राध्यापक, विद्यार्थी व इतर स्पर्धक या प्रश्नमंजुषेमध्ये स्पर्धक ६० % मार्क मिळवेल तो सदरच्या प्रश्नमंजुषेमध्ये पास होईल असा निकष ठेवण्यात आला होता. सदरील स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या तसेच पास होणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी ऑनलाईन पद्धतीनेच प्रश्नमंजुषा जमा केल्यावर तात्काळ गूगल फॉर्म द्वारा सर्टिफिकेट देण्याची सोय महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.भगवान गावित यांनी केली होती.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ऑनलाईन प्रश्नमंजुषेमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे ऑनलाईन प्रतिसाद दिला तसेच पुणे जिल्हा सोडून इतर जिल्हांमधूनही सदरील प्रश्नमंजुषेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला.

सदर ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.



To Top