भोर (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
उच्च शिक्षितांचा मतदानाचा टक्का वाढायला हवा. पदवीधर मतदान संघाची निवडणूकही लोकशाही साठी महत्वाची असून त्यासाठी पदवीधर मतदारांची अधिकाधिक नोंदणी होणे आवश्यक आहे. भारतीय जनता पार्टी मतदार नोंदणीच्या कामात आघाडीवर असून पक्षाचे कार्यकर्ते कंबर कसून तयारीला लागले आहेत, अशी माहिती पुणे पदवीधर नोंदणी प्रमुख रवी भेगडे यांनी दिली. पदवीधर नोंदणी वाढावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भोर येथे आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोर तालुका अध्यक्ष जीवन अप्पा कोंडे होते.
भेगडे म्हणाले की, दर सहा वर्षांनी विधान परिषदेत उच्च शिक्षित पदवीधरांचा एक प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून दिला जातो. या निवडणुकीत नोंदणी आणि मतदान यांचा टक्का कमी असतो. पदवीधर असणाऱ्या मतदारांना नोंदणीचे महत्व पटवून देऊन नोंदणीसाठी करण्याचे काम पक्षाच्या वतीने होते आहे.पुणे पदवीधर मतदार संघ परंपरागत भाजपच्या ताब्यात आहे. याही वेळी इथून आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडुन येईल असा ठाम विश्वास रवि भेगडे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पुणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे,भोर तालुका नोंदणी प्रमुख विजयकुमार वाकडे,भोर युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे,भोर शहराध्यक्ष सचिन मांडके,सरचिटणीस शशिकांत कुडपणे, महिला अध्यक्षा दिपालीताई शेटे, स्वातीताई गांधी,कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे,संतोष लोहकरे, राजाभाऊ गुरव,सुधीर गायकवाड, किशोर धुमाळ,गणेश शिळीमकर, प्रमोद ढम,संजय खरमरे, सुरेश कांबळे, पंकज खुर्द, आकाश जाधव उपस्थित होते.