भोर मध्ये ई लर्निंग साहित्याचे प्रकाशन.
कापूरहोळ (प्रतिनिधी)
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण अखंडपणे सुरू आहे.भोर तालुक्यातील पंचायत समिती विकास गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील तंत्रस्नेही ऑनलाईन टीमच्या शिक्षकांनी अहोरात्र काम करून ई -लर्निंग साहित्य तयार करून सर्व शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. यातून भोर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे.ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे. याचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थी व शिक्षकांना व्हावा असे प्रतिपादन भोर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी के.डी. भुजबळ यांनी केले.
भोर तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी स्वनिर्मित जवळजवळ साडेसहाशे (650) ई- लर्निंग साहित्याची निर्मिती केली आहे.त्याची स्मार्ट पीडीएफ बनवून भोर तालुक्याचे किसन भुजबळ (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भोर शिक्षण विभाग) यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्यावेळेस ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,ऑनलाईन अभ्यासाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा वेळोवेळी दिसून येत आहे. कधीही कम्प्युटर न हाताळलेले विद्यार्थी ई- लर्निंग अभ्यास पद्धतीमुळे सहजपणे तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आले आहेत.
याकामी ऑनलाईन टीमचे सर्व सदस्य शिक्षक व टीमचे मार्गदर्शक विस्तार अधिकारी रुईकर ,सर्व केंद्रप्रमुख विषय तज्ञ मदत लाभली.
यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे,पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे ,शलाका कोंडे,पंचायत समिती उपसभापती दमयंती जाधव,सदस्य लहू नाना शेलार, रोहन बाठे,पूनम पांगारे आदींचे मार्गदर्शन लाभले.