शिक्षकांचा "मा न" हरपला ,केंद्रप्रमुख मा. न. गायकवाड यांचे निधन.

Maharashtra varta






नसरापूर (प्रतिनिधी)

आपल्या आदर्श आचार, विचार ,आणि उच्चाराने 33 वर्षेहून अधिक काळ गुणवत्तापूर्ण काम शिक्षण क्षेत्रात  करणारे व विद्यार्थ्यांना प्रगल्भ गुणवंत ज्ञान  देऊन समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि त्याचबरोबर बुद्धीप्रामाण्यवादाची कास धरून  समाजामध्ये एक नवी प्रतिभावंत जागृती करणारा, जांभळी व सारोळा केंद्राचा कार्यभार सांभाळणारे मारुती नथु गायकवाड " (वय 57)(रा.पुणे )यांचे दि. 4 ऑक्टोबर 2020 रोजी अकस्मात निधन झालं. 

त्यांच्या जाण्याने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, वैचारिक सृष्टीतला एक लखलखता कसदार नाणे असलेला आदर्श केंद्रप्रमुख  अंतर्धान पावला.शिक्षकांचा "मा-न." हरपला  अशी भावना प्रत्येक शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून व्यक्त होत होती.गेल्या 33 वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात  शिक्षक ,मुख्याध्यापक ,तालुका मास्तर ,केंद्रप्रमुख म्हणून  समृद्ध काम केलं. . मा. न. गायकवाड साहेब हे हाडामासाचा अतिशय विरळ शिक्षक,केंद्रप्रमुख  व्यक्तिमत्व होतं. आयुष्यभर सच्चेपणा जगणारा माणूस होता. एक प्रभावशाली शिक्षक होता.त्यांच्याकडे खोटं नावाची गोष्ट नव्हती .जगायचं तर तर्क निष्ठेने ,  कुठली गोष्ट तावून-सुलाखून विश्लेषण करूनच ते जगले. त्यांनी माणसाचे महत्त्व खूप मानलं. सर्वांना सामावून घेण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांची केंद्रप्रमुख व्यक्तिरेखाही तेवढ्यात जोमात, मा. न. गायकवाड साहेब हे नावच सर्वाना  सामावून घेणार होत. 

विद्यार्थ्यांच्या जीवनात नवं भावविश्व निर्माण करणारे ते होते. भोर तालुक्यात आदर्श व गुणिजन  केंद्रप्रमुख यामध्ये  . मा. न. गायकवाड साहेब  यांचं नाव प्रभावी होत. शाळेचं,अथवा आपल्या केंद्राच काम अथवा गावच, मित्राचं अथवा आपल्या शिक्षकांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने सहभाग असणारे व कल्पकतेने काम करणारे . मा. न. गायकवाड साहेब होते. जांभळी  ता. भोर येथे 9 वर्षेहून अधिक काळ केंद्रप्रमुख  म्हणून सध्या काम   पाहिलं.वेल्हे तालुक्यात 25 वर्ष शिक्षक ,मुख्याध्यापक ,तालुका मास्तर ,केंद्रप्रमुख अशा विविध पदावर उत्कृष्ट काम पाहिलं. 

वेल्हे व भोर तालुक्यात 14 वर्ष हुन अधिक  काळ  केंद्रप्रमुख म्हणून प्रामाणिक व सचोटीने काम केलं.त्यांनी राबविलेले सहशालेय उपक्रम  व वार्षिक स्नेहसंमेलन त्यांच्या कामाची ओळख करून द्यायची. त्यांचे केंद्रातील उपक्रम पाहण्यासाठी भोर तालुक्यातील केंद्रप्रमुख,शिक्षक  व अधिकारी, पदाधिकारी त्यांच्या शाळेला आवर्जून भेट देत होते.त्यातून प्रेरणा मिळत  होती.त्यांनी केलेल्या सर्व अध्ययन अध्यापन भूमिकांमध्ये एक विचारांची वेगळी बैठक होती. 
त्यांच अध्यापन सर्व समावेशक व विद्यार्थी घडवणार  होत.त्यातील बरेच विद्यार्थी काही  अधिकारी आहेत तर काही   समाज क्षेत्रात चांगलं काम करत आहेत.ते ज्यावेळी बोलत असायचे , त्यामागे एक विचार होता . प्राथमिक शिक्षकांच्या व केंद्रप्रमुख यांच्या चळवळीत  व वेल्हे तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत आपल्या कामाची छाप पाडणारा शिक्षक नेता होता.एक ,चांगलं नेतृत्व ,कर्तृत्व,  असलेला बाणेदार केंद्रप्रमुख  होते.त्यांनी केलेले आदर्शवत कामांची ,व्यक्तिमत्वाची छाप शिक्षक बंधू भगिनींच्या डोक्यातून,व  स्मरणातून जाऊ शकत नाही.

ज्ञान प्रकाशाने न्हाहून व दुसऱ्यांना उजळून टाकणारे मा. न. गायकवाड साहेब हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होतं . विद्यार्थी ,समाज, नागरिक ,केंद्रप्रमुख शिक्षक,अधिकारी, पदाधिकारी यांचे  ते आदर्श  होते.त्यांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. मा. न. गायकवाड साहेब आपल्यात नाहीत ,यावर विश्वासच बसत नाही, ही कल्पना मनाला असह्य करणारी आहे.त्यांच्या अकाली निधनाने भोर तालुक्याचे खूप मोठ शैक्षणिक नुकसान झाले आहे. समस्त शिक्षक,केंद्रप्रमुख परिवारावर व जांभळी व सारोळा केंद्रावर शोककळा पसरली आहे. 

त्यांच्या मागे पत्नी ,2 मुले 1विवाहित मुलगी असा परिवार आहे.

."न्यूज वार्ताच्या वतीने" व तमाम शिक्षक ,केंद्रप्रमुख ,बंधू भगिनींच्या व समस्त भोरकर,वेल्हेकर  यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली,श्रद्धांजली.💐💐💐💐💐💐💐💐💐💐
To Top