सासवड (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापती पदी पुणे जिल्हा पदवीधर सभेचे सरचिटणीस आणि पतसंस्थेचे संचालक वसंत कामथे यांची बिनविरोध निवड केल्याची माहिती मानद सचिव गणेश कामठे यांनी दिली.
पतसंस्थेच्या मावळत्या सभापती संगीता म्हेत्रे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने वसंत कामथे यांची निवड झाली . वसंत कामथे यांनी या पूर्वी मानद सचिव म्हणून काम पाहिले आहे.ते गेली तेरा वर्षे पतसंस्थेचे संचालक आहेत. पुरंदर पतसंस्था ही जिल्ह्यातील नावाजलेली संस्था असून संस्थेची कमाल कर्जमर्यादा २५ लाख इतकी आहे. सभासदांना १० लाखाचे विमा संरक्षण दिले असून संस्थेने स्वभांडवलाकडे दमदार वाटचाल केली आहे.
पतसंस्थेच्या सभासदांचे हित लक्षात घेत पुढील वाटचाल करणार असल्याचे निवडी नंतर वसंत कामथे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपसभापती सुनील कांबळे, मानद सचिव गणेश कामठे , जिल्हा शिक्षक समिती चे संपर्क प्रमुख संदीप जगताप, माजी सभापती सुनील लोणकर, यशवंत दगडे,रवींद्र जाधव,संगीता हिंगणे, अलका रासकर, अविराज शिंदे ,सलीम मणेर , केंद्र प्रमुख अनिल जगदाळे, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचर पदवीधर सभेचे नेते सुनील जगताप , शांगृनधर कुंभार,लतिफ इनामदार , सुरेश जगताप ,शिवाजी काळाणे,हनुमंत कामथे,भाऊ बरकडे, महिला आघाडी अध्यक्षा मधुबाला कोल्हे,
शोभा कामथे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश कामठे यांनी केले आभार सुनील कांबळे यांनी मानले.