पुणे( प्रतिनिधी):-
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
डाॅ.नितीन राऊत .(उर्जा मंत्री) यांच्या समवेत दि.६ ऑक्टोबर २०२० रोजी भोर-वेल्हा व मुळशी तालुक्यातील सब स्टेशन व वीज सक्षमीकारणाबाबत आमदार संग्रामदादा थोपटे यांची महत्वपुर्ण बैठक एच,एस,बी,सी,बिल्डिंग ३ रा मजला सभागृह,फोर्ट,मुंबई येथे संपन्न झाली.
या बैठकीमध्ये पुढील महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
१.) १३२/२२भाटघर उपकेंद्राचे नुतनीकरण त्वरीत करण्यात यावे सदर ठिकाणी ३३ के ,व्ही,लेवल करण्यासंदर्भात मा,आमदार संग्रामदादा थोपटे यांनी मुद्दा उपस्थित केला,त्याबाबत अधिक्षक अभियंता महापारेषान यांनी सदरचा प्रस्ताव तयार करण्यात आलेबाबत माहीती दिली, तसेच मुख्य अभियंता बारामती परिमंडळ यांनी भाटघर व न्हावी (पेजळवाडी)अशी दोन उपकेंद्र ताताडीने होणे गरजेचे असल्याबाबत सांगीतले.या उपकेंद्राकरीता जमीन अधिग्रहणाचे काम प्रगती पथावर असुन भोर येथील भोर येथील उपकेंद्राकरीता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता सासवड यांना दिल्या.
२.) भोर उपविभाग अंतर्गत अंदाजे १ हजार पोल गंजलेले असुन मोठ्या प्रमाणावर विद्युत वाहीन्यांच्या तारा जीर्ण झाल्या आहेत,त्या बदलण्याबाबत मा.आमदार संग्रामदादा यांनी मागणी केली.त्यावर मुख्य अभियंता बारामती यांनी कार्यवाही करण्याचे आदेश सासवड विभागाला दिले.चालु वर्षात २५८ पोल बदलले असुन ३५० पोल चे वेल्डींग व मफिंग करुन सक्षमिकरण केले आहे अजुन १५० पोल तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतअसल्याबाबत माहीती दिली.
३.) मा.आमदार संग्रामदादा यांनी नवीन शेती पंपासाठी अर्ज स्विकारले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला,यावर अर्ज स्विकारून तातडीने अर्ज अपलोड करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता सासवड यांनी दिल्या,
४.) भोर उपविभागात अतिभारीत रोहीत्रांच्या ठिकाणी रोहित्र क्षमता वाढ किंवा अतिरिक्त रोहित्र बसविण्याबाबत मागणी केली, यावर मुख्यअभियंता बारामती यांनी गावठाणसाठी ३१ व शेती पंपासाठी ३५ नवीन रोहित्रांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे व सदर प्रस्ताव मंजुरीनंतर तातडीने कामे करण्यात येतील अशी माहीती दिली.
५.) आमदार संग्रामदादा यांनी भोर शहरातील संपुर्ण विद्युत वाहीन्या भुमिगत करण्याची मागणी केली.त्यावर आतापर्यत ४.१४ कि,मी,उच्चदाब वाहीनी व १ कि,मी,लघुदाब वाहीनी भुमिगत करण्यात आलेली आहे तसेच उर्वरित ८ कि,मी,उच्चदाब वाहीनी व १० कि,मी,लघुदाब वाहीनी भुमिगत करण्यासाठी एकात्मिक उर्जा विकास योजना क्र २अंतर्गत प्रस्थावित करण्यात येत आहे अशी माहीती मुख्य अभियंता बारामती यांनी दिली.
६.) भोर उपविभागांतर्गत पथदिव्यांच्या कामांना मंजुरी देवून कामे करण्यात यावी अशी मागणी आमदार संग्रामदादा यांनी केली,ज्या ग्रामपंचायतीनी वीज देयाची थकबाकी भरलेली आहे,अशा ग्रामपंचायतीनां नवीन जोडणी देण्यात येईल.
७.) सदर बैठकीमध्ये भोर उपविभातील तांत्रिक संवर्गातील रिक्त पदांची संख्या जास्त असुन तो तातडीणे भरण्याची मागणी केली,मा.मुख्य अभियंता यांनी योग्य ती कार्यवाही करू अशी माहीती दिली.
८.) वेल्हा व मुळशी तालुक्यात ३३/२२/११ के,व्हि,चे नविन उपकेंद्र दरवली येथे उपकेंद्राकरीता गायरान किंवा शासकीय जागेची उपलब्धता पडताळणी करण्यात येईल,कुंभेरी येथे अॅम्बेव्हॅली किंवा महापारेषणची जागा उपलब्ध करुन या ठिकाणी उपकेंद्र प्रस्थावित करण्यात येईल.
९.) खेड शिवापुर,वेळु,व नसरापुर भागाला पुर्ण दाबाने वीज मिळण्यासाठी कामथडी ते खेड शिवापुर नवीन ३३ के,व्हि, विद्युत वाहीनीच्या कामाला गती देण्यातबाबत अधिका-यांना निर्देश देण्यात आले.
१०.) भोर वेल्ह मुळशी तालुक्याअंतर्गत काही पोल व तारा जिर्ण झाल्या आहेत व त्या बदलण्याबाबत मा.आमदार यांनी मागणी केली.व वाहिनीच्या नुतनीकरण व योजनेचे सक्षमीकरण करण्याकरीता प्रस्ताव डोंगरी विकास योजनेअंतर्गत तयार करण्याचे निर्देश दिले.तसेच सध्या वापरात असलेले p.s.c पोल व m.s फॅब्रिकेशन गंजत असुन त्याऐवजी Gacder पोल व GI फॅब्रिकेशन वापरण्यांची मागणी आमदार संग्रामदादा यांनी केली.तसेच डोंगरी भांगाचा विचार करता आवश्यकतेनुसार Rsj पोलला मंजुरी देण्यात येईल असे मुख्य अभियंता यानी सांगितले.
११.) वेल्हा व मुळशी तालुक्यात अतिभारीत रोहित्रांच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्रे बसविण्याबाबत मागणी केली,त्यानुसार नवीन प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना कार्यकारी अभियंता यांना दिल्या.
१२.) आमदार संग्रामदादा यांनी वेल्हा व मुळशी तालुक्यातील नवीन पथदिव्यांच्या कामांना मंजुरी देउन कामे करण्यात यावी अशी मागणी केली,शासन निर्णयानुसार ज्या ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज देयकांची थकबाकी भरलेली आहे अशा ग्रामपंचायतीना नवीन वीज जोडणी देण्यात येईल असे मुख्य अभियंता पुणे यांनी माहीती दिली.
१३.) सदर बैठकीमध्ये नसरापुर व मुळशी उपविभागातील तांत्रीक रिक्त पदांची संख्या जास्त असुन ती तातडीने भरण्याची मागणी मा.आमदार संग्रामदादा यांनी केली,यावर मुख्य अभियंता यांनी मुख्य कार्यालयात रिक्त जागा भरणेची कार्यवाही चालु असुन रिक्त जागा तात्काळ भरण्यात येतील असे सांगितले.
सदर बैठकीला प्रधामन सचिव,तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महावितरक(व्हिडीओ काॅन्फरन्स व्दारे),संचालक (प्रकल्प/वित्त/संचलन )महावितरण,मुख्य अभियंता ,पुणे ग्रामिण,महावितरण,(व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे),अधीक्षक सह सचिव (ऊर्जा),ऊर्जा विभाग, शैलेशदादा सोनवणे-अध्यक्ष भोर तालुका काँग्रेस,अमोल नलावडे-जिल्हा परिषद सदस्य, दिनकरराव सरपाले -सभापती वेल्हे, रोहन बाठे- सदस्य पंचायत समीती भोर,नानासो राऊत अध्यक्ष वेल्हा तालुका काँग्रेस,गंगाराम मातेरे -अध्यक्ष मुळशी तालुका काँग्रेस,व इतर संबधीत अधिकारी उपस्थित होते.