नसरापूर ( प्रतिनिधी) :---
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
कोरोनाविरोधातील लढाई सर्व स्तरांतून सुरू असतानाच कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजना व प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्यासाठी उद्योगपतींपासून सर्वसामान्य जनताही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आहे. केळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षयअप्पा कदम यांचे सामाजिक काम कौतुकास्पद असल्याचे गौरव उदगार राजगड पोलीस स्टेशन, नसरापूर चे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी काढले.
जगदंब प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अक्षय अप्पा कदम यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता कोव्हीड योद्धे असलेल्या समाजातील व्यक्तींना कोरोना विरोधात लढण्यासाठी इम्युनिटी बूस्टर व उपयोगी साहित्य भेट देऊन त्यांचा सत्कार कार्यक्रम केळवडे नुकताच संपन्न झाला ,त्या कार्यक्रमावेळेस पोलीस निरीक्षक वेताळ बोलत होते,ते पुढे म्हणाले की,प्रत्येकाने आपआपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे.
केळवडे पंचक्रोशीतील आशा वर्कर, पोलीस अधिकारी, आरोग्य सेवक,शिक्षक,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते ,यांना कोरोना विरोधात लढण्यासाठी इम्युनिटी बूस्टर व उपयोगी साहित्य अक्षय अप्पा कदम यांनी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळेस पुणे जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख कुलदीप तात्या कोंडे,जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे,भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे,आदी उपस्थित होते.
जगदंब प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, अक्षय अप्पा कदम यांचा गुरुवार दि.15 ऑक्टोबर 2020 रोजी 24 सावा वाढदिवस असून आजपर्यंत त्यांचे सामाजिक काम युवा पिढी ला मार्गदर्शक आहे. आजपर्यंत त्यांनी भोर, वेल्हे तालुक्यातील किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम,वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप,छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित मोफत पुस्तके भेट ,मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप आदी उपक्रम प्रभावी राबविले आहे.
या उपक्रमासाठी सुरज कोंडे, शंभु कोंडे तुषार कदम, गणेश आप्पा कोंडे, ऋषिकेश कोंडे, मंथन कोंडे, पराग कोंडे, आकाश जाधव, राहुल कदम, निखिल कांबळे, बंटी कोंडे,अनिकेत कोंडे यांनी विशेष सहकार्य केले.