तेलवडी येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी"सर्वेक्षण पूर्ण.

Maharashtra varta


(न्यूज वार्ता ऑनलाईन)


 मौजे तेलवडी ता. भोर येथे "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली . या प्रमाणे तेलवडी व कासुर्डी गु. मा. येथील आशा सेविका,   जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन  सूक्ष्म तपासणी करण्यात आली. गावामध्ये एकूण 70 कुटुंबे असून गावची लोकसंख्या 410 इतकी असून 386 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये 53 ज्येष्ठ नागरिक आहेत. या तपासणीमध्ये  संशयित कोरोना व पॉझिटिव्ह एकही रुग्ण आढळून  आले नाही. 


 नसरापूर चे वैद्यकीय अधिकारी जयदीप कापसीकर यांनी या कामी सुयोग्य नियोजन केले. यावेळेस भोरचे महसूल पुरवठा अधिकारी प्रशांत ओहळ, कासुर्डी गु. मा. चे आरोग्य सेवक बाळासाहेब पिसाळ,मोहिनी केसकर,संपर्क अधिकारी समुद्रे मॅडम, आशा वर्कर सुरेखा धावले,सुवर्णा मालुसरे,शिक्षक वनिता गायकवाड, विठ्ठल पवार आदींनी उत्कृष्ट सर्वेक्षण केले.


सर्वेक्षण उदघाटन प्रसंगी  "कासुर्डी गु. मा." चे आरोग्य सेवक बाळासाहेब पिसाळ व मोहिनी केसकर यांनी मार्च 2020 ते आजपर्यंत कासुर्डी गु.मा. उपकेंद्रात रात्रंदिवस उत्कृष्ट वैद्यकीय कार्य केले .कोरोना योद्धा म्हणून त्यांचा ग्रामपंचायत तेलवडी यांच्या वतीने विषेश सत्कार करण्यात आला.


या तपासणी मोहिमेचे व सर्वेक्षणाचे उदघाटन सरपंच दत्तात्रय धावले व संतोष रामचंद्र धावले ,हरिभाऊ धावले,संतोष शामराव धावले यांच्या हस्ते करण्यात आले 



To Top