केंजळ ता. भोर येथे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत ग्रामस्थांची तपासणी.

Maharashtra varta



किकवी (प्रतिनिधी):-
   केंजळ ता. भोर येथे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत ग्रामस्थांचे तपासणी करण्यात आली .ग्रामपंचायत केंजळ मार्फत सर्व ग्रामस्थांना तपासणी होणार असले बाबतची माहिती देण्यात आली. त्या प्रमाणे आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली गावामध्ये एकूण 382 कुटुंबे असून गावची लोकसंख्या 1793 इतकी असून 1425 ग्रामस्थांची तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये 237 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या तपासणीमुळे सुमारे 48 संशयित ग्रामस्थ आढळून आले तर  दोन ग्रामस्थ पॉझिटिव आढळून आले .46 ग्रामस्थांना होम क्वारं टाईन करण्यात आले.  

 यावेळी कृषी अधिकारी कोळी, सहाय्यक गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे, वैद्यकीय अधिकारी मुलाणी, ग्राम विकास अधिकारी मछिंद्र लेंडवे उपस्थित होते .

या तपासणी मोहिमेचे भोरचे  तहसीलदार अजित पाटील यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते .यावेळेस आदर्श मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत दादा बाठे, मा. उपसरपंच महेश बाठे व उत्तम बाठे यांनी या तपासणीसाठी विशेष परिश्रम घेतले.


To Top