नसरापूर ( प्रतिनिधी):-
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
सांगवी ता. भोरचे गावचे मा. सरपंच आणि उद्योजक असलेले बाळासाहेब मसुरकर (वय 54) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दि.1 ऑक्टोबर 2020 रोजी निधन झाले.
सांगवी गावच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. उद्योग व्यवसायात कठीण परिश्रम,जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
सांगवी गावच्या सामाजिक व शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या निधनाने सांगवी ,नसरापूर पंचक्रोशी परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे.
बाळासाहेब यांना श्रद्धांजली व्यक्त करताना राजतोरण पतसंस्थेचे मा. चेअरमन डॉ. संजय जगताप म्हणाले की,आमचे मित्र बाळासाहेब मसूरकर यांचे आज सकाळी निधन झाले.बाळासाहेब आपण फार लवकर एग्जिट घेतलीत ,फार तर 54/55 वय हे काय जाण्याचे वय नक्कीच नाही .एकेकाळी दिवसातला बराच वेळ आम्ही एकत्र असायचो.कै.काशिनाथरावजी खुटवड (आण्णा), तुम्ही,व मी यांनी एकत्रित केलेले काम यातून आपण अण्णांना दिलेली साथ. हे सर्व आठवले.आणि आज खूप गहिवरून आले.मित्रा ........तुला सदगती मिळो.भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐