ध्रुव प्रतिष्ठान तर्फे उपजिल्हा रुग्णालय कोविड विभागासाठी औषधे व फ्रिज भेट.

Maharashtra varta

 



भोर ( प्रतिनिधी)

भोर मधील आदर्श आणि प्रभावी  लोकाभिमुख काम करणारे ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने  समाजसेवक राजीव केळकर यांच्या माध्यमातून शासनाच्या कडून न मिळणारी व गरीब रुग्णाना न परवडणारी औषधे यामध्ये इंजेक्शन इन्सूलीन एत्रापीड 20,फ़ेस शील्ड 25,ओक्सिजन ,मास्क विथ बैग 10,टैबलेट मैड्रॉल (स्टरोईड) ,टैबलेट गौटनील(रक्त पातल करणेसठी),टैबलेट, तेमसान( बी.पी.साठी)तसेस औषधं ठेवण्यासाठी LG कंपनीचा 220लिटरचा फ्रिज, प्रत्येक पेशन्टला औषध ठेवण्यासाठी स्वतंत्र फायबर बॉक्स, व बाहेरील साफसफाई करण्यासाठी एका मजुरांचे महिन्याचे मानधन असे 70हजार किमतीचे साहित्य भोरचे तहसीलदार अजित पाटील व रुग्णालयाचे उपअधीक्षक अंनत साबणे, यांना हस्तांतरित करण्यात आले. 

याप्रसंगी डॉ .स्नेहा ढोरे,डॉ. आनंदा कंक, डॉ. विजयालक्ष्मी पाठक  पत्रकार संघांचे अध्यक्ष सारंग शेटे, निलेश खरमरे, विजय जाधव, आम्ही भोरकरचे अध्यक्ष सचिन देशमुख,ध्रुवचे अध्यक्ष राजीव केळकर उपस्थित होते. 

गरीब रुग्णांसाठी यापुढेही मोठी मदत करणार असल्याचे राजीव केळकर यांनी बोलताना सांगितलं.

To Top