दुर्गम डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

Maharashtra varta

 





पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व भोर तालुका भाजप युवा मोर्चाचा अनोखा उपक्रम.


 भोर (प्रतिनिधी):-

गेल्या काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यामधील नाटंबी या गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी गावामध्ये ज्या ठिकाणी मोबाइलला रेंज येथे अशा ठिकाणी अभ्यास करण्यासाठी झोपडी बनवली होती. परंतु काही समाज कंटकांकडून ही झोपडी पेटवण्यात आली. व यामध्ये या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य पूर्णपणे जळून गेले. या विद्यार्थ्यांना मदत म्हणून पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व भोर तालुका भाजप युवा मोर्चा च्या वतीने पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस सुदर्शन चौधरी, पुणे जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अमोल शिवले ,भोर तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांच्याकडून या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

 या साहित्यामध्ये दप्तर पुस्तके वह्या पॅड कंपोस या साहित्यांचा समावेश होता. त्यानंतर प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देण्यात आली. तसेच या गावामध्ये कायमस्वरूपी मोबाईलला नेटवर्क मिळावे, यासाठी पुण्याचे खासदार गिरीश  बापट  यांच्या नावाने ग्रामपंचायत चा ठराव सरपंच व ग्रामस्थ यांच्याकडून देण्यात आला.या वेळी पुणे जिल्हा भाजप व विद्यार्थी आघाडी यांच्यातर्फे मोबाईल टॉवर बसवण्यासाठी खासदार बापट  यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. या विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन अमर बुदगुडे यांनी दिले.

या वेळी भाजप महिला आघाडी अध्यक्ष दिपाली शेटे सरचिटणीस विजयकुमार वाकडे ,शहराध्यक्ष स्वाती गांधी, मनीषा राजीवडे, संतोष लोहोकरे, समीर निगडेकर ,विठ्ठल होनमाणे सरपंच खोपडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top