गुंजवणीचा प्रकल्प भाजपा सरकारचा.
फक्त महाविकास आघाडीने श्रेय न घेण्याचे भाजपा भोरचे आवाहन.
(गुंजवणी प्रकल्पासाठी मदत आणि निधी मिळणेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भोर व वेल्हे तालुक्यातील भाजपा पक्षाने दिलेले निवेदन )
पुणे (प्रतिनिधी):-
गुंजवणी प्रकल्पासाठी सर्वात जास्त मदत आणि निधी तरतुदी भारतीय जनता पार्टीने व केंद्र सरकारने केली आहे .आणि त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीने याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये,सध्या भोर आणि वेल्हे, तालुक्यात महाविकास आघाडी मध्ये एकमेकांत श्रेय घेण्याचे चढाओढ सुरू आहे,ते थांबवा असे प्रतिपादन भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे यांनी केले.
केळवडे ता. भोर येथे भोर तालुका भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळेस कोंडे बोलत होते ,ते पुढे म्हणाले की,गुंजवणी प्रकल्प हा भोर, वेल्हा पुरंदर आणि शिवगंगा खोरे या कोरडवाहू जमीन ओलिताखाली येण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पूर्ण करण्याकरितात केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारने 2017 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केंद्राने या प्रकल्पासाठी 1235 कोटींची तरतूद केली होती .
त्याला तात्त्विक मान्यता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना 19 मार्च 2018 साली दिली होती.
या प्रकल्पासाठी सर्वात जास्त मदत आणि निधी तरतुदी भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारने केली आहे .आणि पाठपुरावा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. या गुंजवणी प्रकल्पाचे श्रेय महाविकास आघाडी सरकारने घेऊ नये. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने पंधरा वर्षे हा प्रकल्प अपूर्ण ठेवला होता. तेव्हा जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे होते.माजी जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी हे पाणी चुकीच्या पद्धतीने पुरंदरला नेले असताना याला वांगणी आणि वाजेघर खोरे आणि शिवगंगा खोरे हा भाग वंचित राहणार होता, त्यामुळे सर्व पक्षांनी गुंजवणी संघर्ष समिती स्थापन केली. त्यामुळे सगळ्या खोऱ्यांना पाण्याचा लाभ मिळणार आहे.
या वेळेस भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीवन कोंडे ,बाळासाहेब गरुड,विश्वास ननावरे, अशोक पांगारे,संतोष धावले,राजेंद्र मोरे,विनोद चौधरी,अभिजित कोंडे,निलेश पांगारे,आदी उपस्थित होते.