विघ्नहर्ता प्रतिष्ठान व पतसंस्थेच्या माध्यमातून पीएमआरडीए चे नकाशे फ्लेक्स च्या स्वरुपात नागरिकांना करून दिले उपलब्ध.

Maharashtra varta

 विघ्नहर्ता प्रतिष्ठान व पतसंस्थेच्या माध्यमातून  पीएमआरडीए चे नकाशे फ्लेक्स च्या स्वरुपात नागरिकांना करून  दिले उपलब्ध.


किकवी (प्रतिनिधी)

विघ्नहर्ता प्रतिष्ठान व पतसंस्थेच्या माध्यमातून पूर्व भागातील ग्रामपंचायतींना मा.  आदर्श जि.प.सदस्य चंद्रकांत बाठे तसेच भोर पंचायत समितीच्या मा. सभापती सौ. सुनिता बाठे यांच्या हस्ते पीएमआरडीए चे नकाशे फ्लेक्स च्या स्वरुपात वितरित करण्यात आले.

 नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना वस्तुस्थितीची माहिती व्हावी. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सदर नकाशे लावण्यात येणार आहेत.  नागरिकांनी नकाशा पाहणी करुन आपल्या हरकती दि. १५ सप्टेंबर पुर्वी द्याव्यात, असे आवाहन चंद्रकांत बाठे यांनी केले. 

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सरपंच व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

To Top