संतोष मोहिते 28 सप्टेंबरला मंत्रालयासमोर करणार आत्मदहन

Maharashtra varta

 संतोष मोहिते 28 सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालयासमोर करणार आत्मदहन.



सातारा (प्रतिनिधी)

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 8 अन्वये विभागीय चौकशीची कारवाई सुरू करण्यात आलेली होती. सदर विभागीय चौकशी संपून चार महिने झाले, तरीही अंतिम निर्णय घेण्यावर प्रलंबित आहे. अंतिम निर्णय होत नाही, म्हणून 46 सदनिकाधारकांना न्याय मिळत नाही म्हणून मी व माझी पत्नी मुलासह दि. 28 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई मंत्रालय मेन गेट समोर आत्मदहन करणार असले बाबत निवेदन संतोष मोहिते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यमंत्री ना. बच्चुभाऊ कडू, नगर विकास मंत्री, पोलीस महासंचालक ,पोलीस अधीक्षक सातारा, पोलीस निरीक्षक शिरवळ व विभागीय आयुक्त पुणे जिल्हाधिकारी सातारा यांना दिले आहे.


निवेदनात असे म्हटले आहे की मौजे शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा येथील गट नंबर 13 19 /1 भू क्रमांक 2 चे  क्षेत्र 3063 चौरस मीटर मंजूर रेखांकन याप्रमाणे तीन हजार 62 चौरस मीटर प्रमाणे मधील सुधारित इमारत बांधकाम आराखड्यास मंजूरी मिळणे बाबत अशा प्रकरणांमध्ये संतोष गुलाने तत्कालीन लिपिक जमीन संकलन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम विभागीय चौकशीची कारवाई सुरू करण्यात आलेली होती. विभागीय चौकशीची सुनावणीची कारवाई संपली असून सदर विभागीय चौकशी ही अंतिम निर्णय घेण्यावर प्रलंबित आहे .परंतु अंतिम निर्णय होत नाही. सन 2016 पासून शिरवळ येथील बिल्डर यांच्याकडून अनधिकृत बांधकाम झाल्या संदर्भात संतोष मोहिते यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी सातारा व वरिष्ठांकडे याबाबत वारंवार तक्रारी करूनही सुमारे पाच ते सहा वर्ष कालावधीत न्याय न मिळाल्याने संतोष मोहिते यांनी  निकालाबाबत आत्मदहन सारखे अंतिम टोकाचे निर्णय घेऊनही सातारा जिल्हा महसूल प्रशासनाकडून सुमारे पाच ते सहा वर्ष कालावधीत कार्यक्षम अधिकारी असतानाही आज पावेतो कोणताही निर्णय न झाल्याने 46 सदनी धारकांवर अन्यायाबाबत संतोष मोहिते त्यांची  पत्नी मुलांसह मुंबई मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहेत.


संतोष मोहिते यांनी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचे कार्यालयामध्ये दिनांक 13/ 11 /2020 व 15/ 7 /2021 रोजी दोन वेळा आत्मदहनाचा प्रयत्न केला, परंतु सातारा महसूलने आम्हाला न्याय दिला जात नाही ,त्यामुळे मी मुंबई मंत्रालयाचे समोर आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतला आहे.  तरी या निवेदनाचा विचार करून सदनिकाधारकांना तात्काळ न्याय द्यावा. न्याय न दिल्यास 28 सप्टेंबर 2021 रोजी मंत्रालय मुंबई येथे मेन गेट समोर आत्मदहन करणार आहे असे निवेदनात संतोष मोहिते यांनी म्हटले आहे.

To Top