युवा उद्योजक आणि भोर तालुका शिवसेनेचे विभागप्रमुख पै. गणेशभाऊ गोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Maharashtra varta

 करंदी खेडेबाराचे प्रसिद्ध युवा उद्योजक आणि भोर तालुका शिवसेनेचे विभागप्रमुख पै. गणेशभाऊ गोळे यांना वाढदिवसाच्या सहस्त्रकोटी शुभेच्छा


भोर ( प्रतिनिधी):--टी. यादव पाटील

" गेली 3 दशक  जनहक्कांसाठी व जनहितासाठी स्वप्न पाहायचे ,त्याची मागणी करायची नि त्या स्वप्नपूर्ती साठी आपल्या सहकाऱ्यांमध्ये तीव्र इच्छा निर्माण करायची, स्वतः तर परिपुर्ण पूर्तीसाठी  विश्वास ठेवायचाच तसेच सहकाऱ्यांनासुद्धा विश्वास द्यायचा आणि स्वप्न खरे करायचे"हा दिव्य संदेश हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गेली 8 वर्ष स्वतःच्या गावात करंदी खे. बा. व पंचक्रोशी परिसरात एक चांगला कार्यकर्ता व  शिवसेना विभागप्रमुख म्हणून  गणेशभाऊ गोळे'" काम करताना दिसत आहेत.  नुकतेच करंदीच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एस टी पास,शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, गावातील युवकांच्या सुख दुःखात सहभागी होणे, गावातील सामाजिक प्रश्न सोडविणे,कोरोना काळातील सामाजिक काम आदी कार्य प्रभावीपणे करत आहेत.

"प्रत्येक वादळ पेलिन मी..

मला आत्मविश्वास आहे.

माझ्या पाठीशी आकाश आणि पायाशी जमिन आहे.

पाय जमिनीत रोवून मी.. 

सह्याद्रीपरी ताठ उभा आहे... 

जावून सांगा त्या वादळांना.. 

तुमची माझ्याशी गाठ आहे.....

असा थक्क करणारा उद्योग, राजकारण, क्षेत्रातील प्रवास गणेशभाऊ गोळे यांचा आहे.

त्यांच्याबद्दल थोडक्यात,

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेडेबारा मावळमधील ऐतिहासिक करंदी खे. बा.येथील सर्वसामान्य शेतकरी कुंटुबात गणेश भाऊ यांचा  जन्म झाला.वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांच्या आई वडिलांकडून झाले. प्राथमिक शिक्षण करंदी या गावी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक व वाणिज्य पदवीचे शिक्षण अनुक्रमे चेलाडी,नसरापूर ता भोर येथील श्री. शिवाजी विद्यालयात यशस्वी रीतीने पूर्ण केले."ना नफा ना तोटा या तत्वावर उभारलेले वडिलांनी किराणा दुकानाच्या व्यवसायात लक्ष दिले.उत्तम आरोग्य हीच संपत्ती आहे..याचे महत्त्व जाणून कोल्हापूर येथे उत्तम तालीम कुस्त्या करून शरीर संपदा मिळविली. गावाकडे आल्यावर बऱ्याच वर्षांपासून  संत राधास्वामी हा सत्संग कार्यक्रम  गावात सुरू होता. आध्यात्मिक कतेचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले त्यातूनच हा सत्संग कार्यक्रमास गती देऊन खरी ईश्वरभक्ती स्वरूप व माहिती आपल्याकडे असणाऱ्या उपलब्धतेप्रमाणे घराघरात पोहचवली.हे करता -करता घरच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली.गावातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कामात सहभागी होऊन यातील स्वतःची बांधीलकी जपली.यातूनच समाजकारण करता करता त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्याना शिवसेनेचे विभागप्रमुख पदाची जबाबदारी दिली. ती  जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसत आहेत.

हे सर्व करताना  करंदी या त्यांच्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महिला मंडळ,तरुण या सर्वांना आपल्या यथाशक्ती प्रमाणे मदत करताना दिसत आहेत.  शेतकऱ्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी गावात शेतकरी गट स्थापन करून उत्तम काम करताना दिसत आहे.सरकारमान्य केरोसीन दुकानाच्या माध्यमातून करंदी या त्यांच्या गावातील सर्वांची सेवा करत आहेत,ती तब्बल 30 ते 32 वर्ष.,हे करीत असताना उद्योग व्यवसायात विशेष लक्ष केंद्रित परिश्रम, जिद्द, चिकाटी जोरावर  अचूकपणे काम करून त्यात गणेश भाऊ कमी वेळेत  यशस्वी झाले..

 सुखात मागे व दुःखात पुढे  या उक्तीप्रमाणे आपल्या स्नेहीजनाच्या मित्रपरिवारांच्या व आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्ते.पक्षातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पदाधिकारी यांच्या सुख दुःखात  ' " गणेशभाऊ गोळे" सहभागी होताना दिसत आहेत. अशा सर्वांच्या लाडक्या तरुण तडफदार विनयशील वैभवशाली व्यक्तिमत्व लाभलेले 

गणेशभाऊ गोळे" यांचा  वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या दमदार वाटचालीचा अनुभव आपल्या सर्वाना आल्यावाचून राहत नाही. 

सर्वांच्या लाडक्या तरुण तडफदार विनयशील     वैभवशाली व्यक्तिमत्व लाभलेले गणेशभाऊ गोळे यांचा आज गुरूवार  2 सप्टेंबर 2021  दिवशी त्यांचा  वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या दमदार वाटचालीचा साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अनुभव आपल्या सर्वाना आल्या वाचून राहत नाही.

अशा ध्येयनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ ,समाजहितेशी व योग्य समाजकारण म्हणजे राजकारणाचे विलक्षण वेड असणाऱ्या ऐतिहासिक शिवरायांच्या खेडेबारा मावळच्या युवा मावळयाला अर्थातच गणेशभाऊ गोळे  यांना भावी काळात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात व राजकीय वाटचालीत यशाची शिखरे गाठण्यासाठी  आई जगदंबा उदंड शक्ती व सामर्थ्य देवो हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने समस्त भोरकर  "आम्ही करंदीकर" यांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा.

_________________________

शुभेच्छुक:श्री.  नवनाथ गायकवाड.

कार्यकर्ते :-शिवसेना भोर तालुका.

To Top