प्रा.संतोष यादव यांना अर्थशास्त्रा मध्ये पीएच डी.

Maharashtra varta

 प्रा.संतोष यादव यांना अर्थशास्त्रा मध्ये  पीएच डी.


नसरापूर (प्रतिनिधी) :-

देगाव ता.भोर येथील प्राध्यापक संतोष गुलबराव यादव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची अर्थशास्त्र विषयाची पीएच डी पदवी मिळाली आहे.

संतोष यादव हे  शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय वडगाव बु.पुणे येथे प्राध्यापक असुन त्यांनी पुणे जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडुन  शेतकऱ्यांसाठी  राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजनांचा 2004 ते 2014 या कालावधीतला चिकित्सक अभ्यास करुन या विषयावर प्रबंध सादर केला होता.पुणे विद्यापिठाऩे तो मान्य करत प्रा.यादव यांना पीएच डी प्रदान केली आहे.

या संशोधन प्रबंधासाठी त्यांना प्राचार्य दिलीप भोईटे, प्राचार्य एस के ढगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशा बद्दल शिवछत्रपती महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच देगाव  ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

प्रा.संतोष यादव यांनी या यशा बद्दल बोलताना माझी आई मुक्ताबाई व वडील गुलाबराव यांच्या कष्टाचे व विश्वासाचे हे फलित असल्याचे सांगुन पत्नी व मुलाने देखील यासाठी वारंवार प्रेरणा दिल्याचे सांगितले.

अतिशय प्रतिकूल,हलाखीच्या  परिस्थितीत संतोष यादव यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण   श्री शिवाजी विद्यालय नसरापूर येथे तर पदवी व पदवीत्तोर शिक्षण जेधे कॉलेज पुणे येथे पूर्ण केले.या कालावधीत परिश्रम,जिद्द चिकाटी,मेहनतीच्या जोरावर यादव यांनी  हे शिक्षण यशस्वी रित्या पूर्ण  करून  पीएचडी मिळवली. यादव यांनी समाजासमोर,युवकांसमोर आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल समाजातून यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

To Top