भोर तालुक्यात प्रहार पदाधिकारी निवड जाहीर.

Maharashtra varta

 भोर तालुक्यात प्रहार पदाधिकारी निवड जाहीर



भोर ( प्रतिनिधी)

 टीटेघर ता. भोर  येथील सचिन  नवघणे व न्हावी येथील अजय  कांबळे यांची भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष पदी व  हनुमंत  सुतार टीटेघर गाव शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती  करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा प्रहार पक्षाचे अध्यक्ष अनंतराव काळे  यांच्या नेतृत्वाखाली भोर तालुका प्रहार पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी वरील निवड केलेली आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात  सामाजिक उपक्रम, अपंग ,रुग्ण गोरगरीब यांचे प्रश्न सोडविणे आदी विविध  कार्यात नवनियुक्त पदाधिकारी यांनी सक्रियपणे सहभाग नोंदवा असे आवाहन भोर तालुका  प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष  मोहिते यांनी केले.नवनियुक्त पदाधिकारी यांनी रक्तदान केले.यावेळेस प्रहारचे प्रमोद मोहिते उपस्थित होते.

यावेळेस  भोर तालुक्याचे प्रहार पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.



To Top