भोर पंचायत समिती सभापतींसह दोन सदस्यांचे पद जिल्हाधिकार्‍यांनी केले रद्द.

Maharashtra varta

 भोर पंचायत समिती सभापतींसह दोन सदस्यांचे पद जिल्हाधिकार्‍यांनी केले रद्द.


भोर (प्रतिनिधी)

भोर पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव व पंचायत समिती सदस्य श्रीधर किंद्रे व पंचायत समिती सदस्य मंगल बोडके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी रद्द केले असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून पक्षातील सर्वात मोठी कारवाई मानले गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या पंचायत समिती सभापती च्या निवडणुकीमध्ये सभापती पदाची उमेदवारी लहू नाना शेलार यांना दिली. मात्र इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांनी पक्षाचा आदेश तथा व्हीप  पाळला गेला नाही. त्यांच्याकडून बंडखोरी झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि उपसभापती लहू नाना शेलार यांनी 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती .

त्यानुसार महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अहर्ता अधिनियम 1986 चे कलम 3(1 )बी मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांनी वरील निर्णय दिला आहे .जिल्हाधिकारी सभापती व अन्य  दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात सर्वांत मोठी खळबळ उडाली आहे. 

भोर पंचायत समितीचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती लहू नाना शेलार हेच पाहतील असेही त्यांनी सांगितले.

लहू नाना शेलार (उपसभापती पंचायत समिती भोर) यांनी न्यूज वार्ता शी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकुशल खासदार सुप्रियाताई सुळे व पुणे जिल्हाअध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे या विषयाबाबत मी सातत्याने आणि निर्भीडपणे पाठपुरावा केला होता .त्यानुसार जिल्हाध्यक्ष व मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती चौकशी न्यायनिवाडा करत न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाशी प्रामाणिक आणि निष्ठेने काम केल्यास पक्ष देखील आपल्या कामाची उचित दखल घेतो, असा संदेश या निमित्ताने कार्यकर्त्यांना जातो असे लहू नाना शेलार यांनी सांगितले.

To Top