गुरुकुल संस्थेचे कार्य अभिमानास्पद ,आमदार संग्राम थोपटे.

Maharashtra varta

 गुरुकुल संस्थेचे कार्य अभिमानास्पद ,आमदार संग्राम थोपटे.




भोर (प्रतिनिधी)

एक संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना लहान वयातच वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे आणि हे कार्य आज या ठिकाणी अविरतपणे सुरू आहे भोलावडे हे एक भक्ती आणि संप्रदायाची एक निष्ठा असणारे गाव असून या गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे. या गावात महाराष्ट्रातील सर्वात जुना 90 वर्षापूर्वीचा हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू आहे .हाच वारसा पुढे भव्यदिव्य स्वरूपात चालवण्यासाठी ह-भ-प उमेश महाराज शिंदे यांच्या हातून विद्यार्थी कीर्तनकार प्रवचनकार गायक-वादक  घडत आहे. यामुळे माऊली विद्यार्थी सेवा ट्रस्ट गुरुकुल यांच्या संस्थेमार्फत सुरू असलेले कार्य अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार भोर ,वेल्हा  मुळशी चे आमदार संग्राम थोपटे यांनी काढले.


 माऊली विद्यार्थी सेवा ट्रस्ट संचलित गुरुकुल भोलावडे येथील प्रथम वर्धापन दिनाच्या प्रसंगी आमदार संग्राम थोपटे बोलत होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ज्येष्ठ वारकरी  आदर्श वारकरी यांचा  सन्मानचिन्ह देऊन सन्मान  करण्यात आला. तसेच माऊली  विद्यार्थी सेवा ट्रस्ट गुरुकुल प्रथम वर्धापन दिनाचा वार्षिक अहवाल मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

गुरुकुल संस्थेला आमदार संग्राम थोपटे यांनी रोख रक्कम रु.५१ हजारांची मदत  केली.व इतर मान्यवर ,नागरिक यांनी देखील देणग्या दिल्या.

      या कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे हे स्वागताध्यक्ष होते, ओविशा फूडचे चेअरमन अर्जुनराव चव्हाण, राजगड संस्थेचे विश्वस्त पंढरीनाथ भिलारे, संगीत विशारद कंक सर, राजू महाराज शास्त्री, दत्तात्रय  गावडे,  भोर तालुका पत्रकार संघाचे भुजंगराव दाभाडे, शिंदचे सरपंच शंकरराव माने, लक्ष्मण सणस, मंगेश आवाळे, श्रीरंग आवाळे,हरिप्रसाद महाराज  सवणे यांचेसह वारकरी मंडळी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह-भ-प उमेश महाराज शिंदे यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत  राजेंद्र महाराज शास्त्री यांनी करून या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.


(माऊली विद्यार्थी सेवा ट्रस्ट गुरुकुल च्या माध्यमातून उमेश महाराज शिंदे एक चांगले अध्यात्मिक काम करत आहे. त्यांनी अपंग विद्यार्थ्यांसाठी 10 ते 12 लाख रुपयांचे साहित्य वाटप केले आहे. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गोर गरीब होतकरू 40 विद्यार्थ्यांना सायकल देखील वाटप केले आहे .त्यांच्या या गुरुकुलमध्ये 21 विद्यार्थी निवासी असून भोलावडे पंचक्रोशी  परिसरातील 61 अनिवासी विद्यार्थी  शिक्षण घेत आहेत.)

To Top