पुणे सातारा महामार्गालगत टपरी टाकल्यास कायदेशीर कारवाई करणार:-पोलीस निरीक्षक सचिन पाटील.
नसरापूर (प्रतिनिधी):-
कापूरहोळ सर्विस रोड लगत व महामार्ग लगत असणाऱ्या टपऱ्या राजगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी अवघ्या पंधरा मिनिटात काढून कापूरहोळ चौकाने व सर्व्हिस रोडने सुटकेचा श्वास सोडला. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी केलेल्या कारवाईचे कापूरहोळकरांनी जंगी स्वागत केलेले आहे .अशीच कारवाई देखील पुढे चालू राहावी असे म्हणत या कारवाईबद्दल कापूरहोळकरांनी पोलीस निरीक्षक पाटील यांचे अभिनंदन करत त्यांना या पुढील कारवाईसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पाटील( पोलीस निरीक्षक, राजगड पोलीस स्टेशन) यांनी कापूरहोळ चौक येथील सर्व्हिस रोडला व मुख्य रोडच्या शेजारी असलेल्या सर्व टपऱ्या अवघ्या १५ मिनिटात काढून, कापूरहोळ गावातील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची तत्काळ कापूरहोळ चौक येथे बैठक घेऊन, पुन्हा रोडच्या कडेला टपऱ्या कोणी टाकणार नाही. तसेच सदर ठिकाणी असलेल्या एस. टी. च्या थांब्या बाबत पुढील आठवड्यात कापूरहोळ गावातील गावकरी, एस. टी. महामंडळाचे पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेणार असल्याचे ही पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले व पुणे सातारा महामार्गालगत टपरी टाकल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक सचिन पाटिल यांनी टपरीवाल्यांना इशारा दिला. तसेच किकवी, कापूरहोळ, हरिश्चंद्री, वर्वे येथे पुणे सातारा महामार्गालगत रोडच्या दोन्ही बाजूला लोखंडी ग्रील बसवनेबाबत प्रकल्प संचालक पुणे यांना पत्र व्यवहार केला असल्याबाबतही त्यांनी ग्रामस्थांना माहिती सांगितली. तसेच हरिश्चंद्री येथील पूलाखालील रोडची पहाणी करून, सदर रोड लोक सहभागातून करण्याबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली.
दि.17 रोजी वरवे येथे महामार्गावर पडलेल्या खड्डयात स्वतः सचिन पाटील यांनी उभे राहत फोटो काढून, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग पुणे यांना हॉट्सप वर पाठवल्या नंतर लगेच दि.१८ रोजी पुणे सातारा महामार्गावरील खड्डे बुजवण्यास रिलायन्स कडून सुरवात करण्यात आली.
कापूरहोळ येथील सर्विस रोड व मुख्य चौका लगत असणाऱ्या टपऱ्या पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पंधरा मिनिटात काढून कापूरहोळ चौक मोकळा केला. त्याबद्दल ग्रामपंचायत कापुरहोळ च्या वतीने त्यांचे स्वागत करतो व ही कारवाई केवळ तात्पुरती न राहता कायमस्वरुपी रहावी असे त्यांनी सांगितले.आम्ही आपल्यासोबत आहे.असे कापूरहोळ ग्रामपंचायत सरपंच पंकज बाबी गाडे यांनी सांगितले.