भूगाव येथे राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम विविध उपक्रमांनी संपन्न .

Maharashtra varta

 संतुलित आहार बालकांसाठी महत्वाचा:-आयुर्वेदाचार्य डॉ. हृदया सोलंकी.

भूगाव येथे राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम विविध उपक्रमांनी संपन्न .



भूगाव (प्रतिनिधी)

लहान मुलांचे आरोग्य व पोषणविषयी जागरूकता निर्माण करून पोषणयुक्त व संतुलित आहार विद्यार्थ्यांना अंगणवाडीमध्ये देऊन पालकांना देखील याबाबत उद्युक्त करून पोषणयुक्त आहार आपल्या पाल्याला द्या आणि आपला पाल्य पोषणयुक्त  होण्यासाठी  सहभाग व योगदान द्या,त्यासाठी संतुलित आहार खाऊ घाला. आपला  गाव, आपला तालुका आणि  जिल्हा कुपोषणमुक्त करू या असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. हृदया सोलंकी यांनी केले.

एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना प्रकल्प मुळशी ता.मुळशी अंतर्गत बिट  मुठा 2 चे राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रम भूगाव येथे संपन्न झाला .त्यावेळेस डॉ. सोलंकी बोलत होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितले की पूर्वी नैसर्गिक उपचार पद्धती होती. प्राचीन कालखंडापासून आयुर्वेदाचं मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हे आयुर्वेद आपलं स्वास्थ्य निरोगी व समृद्ध राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतं.साधे साधे उपचार आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून बरे करता येतात आणि या उपचारातून आपण व आपले कुटुंब व आपला परिसर नागरिकांचे स्वास्थ्य अबाधित राखण्यास यामुळे मदत होणार आहे .या कार्यक्रमाच्या प्रसंगी दैनंदिन जीवनामध्ये शरीरासाठी आयुर्वेदाचे फायदे या विषयावर ती आयुर्वेदाचार्य रुदया सोलंकी बोलत होत्या. 

 27 अंगणवाडी  केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यावेळेस उपस्थित होत्या. तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प बिट मुठा 2  अंगणवाडी सेविकांनी पोषण युक्त पदार्थ बनवून तयार करून आणले.त्याचबरोबर पोषणयुक्त आहाराबद्दल घोषवाक्ये स्टिकर प्रदर्शित केले.यामध्ये  गरोदर माता ताट हा पदार्थ भुगाव एक  क्रमांकाच्या अंगणवाडी सेविका निर्मला सुर्वे यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. तसेच भोडे  दोन  सेविका सविता मारणे यांनी थालीपीठ यासाठी त्यांना द्वितीय  क्रमांक देण्यात आला, तर अंगणवाडी केंद्राच्या सेविका उषा पासलकर यांनी नाचणीची भाकरी व मेथीची भाजी साठी तृतीय क्रमांक देण्यात आला. त्याच बरोबर उत्तेजनार्थ बक्षीस कातवडी अंगणवाडी केंद्राच्या वंदना मानकर यांनी आळूची पाने तर मुठा  अंगणवाडी केंद्राच्या अलका पवार नाचणीचे लाडू ,तर खरवडे कोळवडे च्या सुरेखा उभे यांनी हाळीव खीर हे पूरक आणि उत्कृष्ट आहार पदार्थ बनवून आणल्याबद्दल यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सविताताई दगडे ,मुळशी पंचायत समितीच्या सभापती राधिकाताई कोंढरे, भुगावच्या उपसरपंच वैशाली सणस ,भूगावच्या ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई सुर्वे उपस्थित होत्या.

एकात्मिक बालविकास प्रकल्प बिट  मुठा 2 च्या  पर्यवेक्षिका जयश्री मोहिते यांनी या राष्ट्रीय पोषण महिना या उपक्रमाचे प्रभावीपणे नियोजन व आयोजन करून मान्यवर पाहुण्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत असेच उपक्रम बिट मध्ये आयोजित करून मुळशी  तालुक्यात आपल्या बिटाचा ठसा उमटवावा. असे प्रा. सविताताई दगडे यांनी मनोगतात सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिट मुठाच्या पर्यवेक्षिका जयश्री मोहिते यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विठ्ठल पवार यांनी केले.

To Top