अनिलभाऊ चौधरी यांनी घडवले संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन.
रावेर (प्रतिनिधी)
ध्येयवेडी माणसं कुटूंबाच्या वाट्याला येतच नाही, ती समाजाच्या वाट्यालाच अधिक असतात. म्हणून आज प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांनी संवेदनशीलता आणि माणुसकीचे दर्शन दर्शविले.
यावल रावेर मतदारसंघातील न्हावी या गावातील एक निराधार गरीब महिला अनिलभाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी पोहचली त्यांना एकच पाय होता आणि त्या पायात ही रॉड होता ऑपरेशन साठी पैसे नव्हते घराची परिस्थिती अतिशय हलाखीची त्यात अनिलभाऊ चौधरी यांनी माणुसकीचे दर्शन घडवून माणुसकीचा संदेश दिला आहे. त्यांच्या या विविध कामांचे कौतुक समाजाकडून होत आहे.
गोरगरीब जनतेच्या च्या दुःखाच माहेर घर म्हणजे अनिलभाऊ चौधरी. न्हावी येथील एक निराधार महिला अनिलभाऊंच्या निवास्थानी आली ,आणि त्याच्या पाय पूर्णता सडला होता अनिलभाऊंनी पुढील उपचारा करीता स्वतःच्या गाडीत त्यांना रुग्णालयात भरती केले.त्यात ताईकडे पैसे सुद्धा नव्हते होते, म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शक्य तेवढी मदत केली .डॉक्टरांची भेट घेऊन पुढील उपचार सुरू केला म्हणून तर गोरगरीब कुटूंबातिल आरोग्य दाता म्हणून त्याची ओळख आहे. त्याच कार्य नेहमीच कौतुकास्पद असत. रात्री बेरात्री अगदी सहजपणे कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयात जाण्यासाठी उपलब्ध होतात..
यावेळी डॉ. निलेश महाजन यांच्याशी चर्चा केली. सोबत प्रहारचे जळगाव जिल्हाउपाध्यक्ष संजयभाऊ आवटे व गिरीश मिस्तरी होते