नसरापूर येथील विद्युत रोहित्र चोरीला.
नसरापूर उपविभागातील गेल्या दीड महिन्यात पाच रोहित्र चोरीला.धक्कादायक घटना.
नसरापूर (प्रतिनिधी) : -
भोर तालुक्यातील नसरापूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभाग अंतर्गत नसरापूर येथील सहयाद्री सिटी नसरापूर येथील 1 व आसकवडी येथील 1 टान्सफामॅर (डि.पी.) चोरीला गेल्याने नसरापूर व आसकवडी परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
नसरापूर व आसकवडी येथील डि. पी. अज्ञात चोरांनी चोरली. डि. पी. चोरीचा हा प्रकार मंगळवार व बुधवार (दि.28 व 29 ) रोजी घडला. गेल्या दीड महिन्यात नसरापूर उपविभाग अंतर्गत एकूण 5 ट्रांसफार्मर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती नसरापूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ घाटुळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.
.चोरांनी डिपीतील कॉपरची कायल व आॅईल हे सगळे चोरांनी चोरून नेले आहे. नसरापूर वीज वितरण कंपनीचे अधिकारी घाटूळे यांच्या कर्मचारी यांनी नसरापूर व वेल्हे येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती समजते.
नसरापूर येथे सहयाद्री सिटी येथील सदनिका धारकांच्या लगत असलेली व भिंतीचे कुंपणाच्या आत मध्ये असलेली डीपी , चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.डि.पी.ची चोरी करताना बराच वेळ गेला असेल असे शेतकरी व नागरिकांत चर्चा आहे.मागे काही दिवसांपूर्वी शिंदेवाडी ,केळवडे येथे असा प्रकार घडला होता.
नसरापूर वीज वितरण कंपनीने या प्रकाराला आळा बसेल अशा उपाययोजना कराव्यात व पोलिसांनी अज्ञात चोराचा शोध तात्काळ घेवून कारवाई करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य नेते श्यामसुंदर जायगुडे यांनी केली आहे.
नसरापूर वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी नवनाथ घाटूळे यांनी सांगितले की नसरापूर उपविभागातील गेल्या दीड महिन्यात पाच रोहित्र चोरीला गेले आहेत. ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.
भोर पंचायत समितीचे सभापती लहु नाना शेलार यांनी प्रतिनिधीशी बोलताना असे सांगितले की, रोहित्र चोरणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात यावा अशी कायद्यात सरकारने तरतूद करावी. त्यामुळे रोहित्र चोरणारे यांवर जरब बसेल व अशा प्रकारांना आळा बसेल.