धांगवडी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न.

Maharashtra varta

 भोर तालुक्यात पाणंद रस्ते साठी  शिवार भेट कार्यक्रम घ्या:-पंचायत समिती सदस्य रोहन बाठे यांची मागणी.

धांगवडी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न .


नसरापूर ( प्रतिनिधी)

गावागावातील  अतिक्रमण मुक्त पाणंद रस्ते यांविषयी व्यापक शिवार भेट कार्यक्रम घ्यावेत.जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतात सहज जाता येईल.शेती माल वाहतूक करणे, मजुरांची ने आण करणे व पाळीव जनावरे यांना डोंगरात अथवा शेतकऱ्यांच्या आपल्या आपल्या शेताच्या परिसरात गवत चारण्यास नेता येईल यासाठी  अतिक्रमण मुक्त पाणंद रस्ते यांविषयी व्यापक शिवार भेट कार्यक्रम घ्यावेत.अशी मागणी भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे  यांनी केली.

महाराष्ट्र शासन महसूल विभाग महाराष्ट्र अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी कार्यक्रम हा बळीराजा मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी   राजेंद्र कचरे प्रांत भोर उपविभागीय अधिकारी, सचिन पाटील तहसीलदार भोर,  रोहन बाठे भोर पंचायत समिती सदस्य, यांनी मनोगत व्यक्त केले.

तहसीलदार सचिन पाटील यांनी योजनेविषयी माहीती देताना जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेण्याचे व पिक पेरा ऑनलाईन नोंदवण्याचे आवाहन केले , उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी मेळाव्यास उस्फूर्त प्रतीसादा बद्दल स्थानिक अधिकारी व पदाधिकारी, सहभागी लोकांचे अभिनंदन केले  व नव्यानेच आलेल्या अध्यादेशा प्रमाणे ज्या शेतकऱ्यांना  सातबारावरील पोटखराबा लागवडीयोग्य करुन क्षेत्र वाढ करण्याचे अधिकार प्रांत अधिकार्ऱ्यांना प्राप्त झाले असल्याचे सांगीतले. तसेच मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. शेखर जगताप यांनी सूत्रसंचालन केले व सर्कल भुतकर मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच विजय गरुड, नवनाथ भिलारे नवनाथ कदम, बाळासाहेब बोबडे, अभिमन्यू कोंढाळकर, संगीता मोरे,  सुरेखाताई निगडे, सोमनाथ निगडे, संतोष मोरे, नरेंद्र मोदी, किरण घारे, तलाठी चंद्रशेखर जगताप, सुधाकर सोनवणे, विकास गाडे किकवी मंडल सर्व पंचक्रोशीतील आजी-माजी सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक व लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

यावेळी उपस्थित लाभार्थीना उत्पन्नाचे दाखले, रेशनिंग कार्ड विभक्त करणे, नाव वाढवणे, कमी करणे ,संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र,उत्पन्न दाखले, डोमिसाईल, वारसनोंद दाखले देण्यात आले.

To Top